Showing posts with label इस्रो. Show all posts
Showing posts with label इस्रो. Show all posts

Friday, August 13, 2010

इस्रोची गरुड भरारी

 • 'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे समुद्राच्या पातळीत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त होत असताना ही वाढ नेमकी किती व कोठे होते आहे याचे अचूक निरीक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) व फ्रान्सची राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था (सीएनईएस) संयुक्तरित्या 'सरल'  (SARAL) हा उपग्रह सोडणार आहेत. या उपग्रहाचे प्रक्षेपण पुढील वर्षी होणे अपेक्षित .
 • इस्रो च्या 'चान्द्रयानाने' चंद्रावर भारतीय ध्वज कधी फडकवला?
  • भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू , ज्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताचा अंतरीक्ष कार्यक्रम आज हे स्वरूप घेवू शकला, त्यांच्या जयंतीच्या दिवशी (बाल दिनी ) 14 नोव्हेंबर 2008 ला भारतीय ध्वज चंद्रावर फडकला. 
 • इस्रोने 2009 मध्ये शोधलेले 3 सूक्ष्मजीव
  • १.जानीबॅक्टर हॉइली - फ्रेड हॉइल च्या स्मरणार्थ ( जयंत नारळीकर याच हॉइल यांचे शिष्य)
  • २.बॅसिल्लस इस्रोनेन्सीस- इस्रोने हे जीव शोधताना केलेल्या 'बलून एस्क्पीरीमेंट्स' च्या योगदानाबद्दल
  • ३.बॅसिल्लस आर्यभट - प्राचीन भारतीय शास्रज्ञ आणि भारताचा पहिला उपग्रह यांच्या नावाने. 
 • अंतरीक्ष कॉर्पोरेशन लिमिटेड (Antrix Corporation Limited ) हि भारत सरकारच्या आधिपत्याखाली काम करणारी खाजगी कंपनी म्हणून काम करते. हि कंपनी पूर्णपणे सरकाच्या मालकीची आहे. इस्रो ने संशोधन केलेल्या यंत्रणा आणि तंत्रज्ञान यांचे व्यापारीकरण करण्याची जबाबदारी यांच्यावर आहे.
 • मेघा-ट्रोपीक्स (Megha-Tropiques )
  • भारत - फ्रांस यांच्या संयुक्त प्रयत्नातून आकारात येत असलेला प्रगत असा हवामान विषयक उपग्रह आहे.
 • युथसॅट- भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून आकारात येत असलेला उपग्रह .
 • गगन - जी.पी.एस ला पर्याय म्हणून तयार होत असलेली संपूर्ण भारतीय बनावटीची यंत्रणा. 'इंडिअन रिजनल नेव्हीगेशनल  सॅटेलाईट सिस्टम' (IRNSS) आहे.
  • जी.पी.एस हि अमेरिकीची यंत्रणा
  • चीनची - बेईदोउ (Beidou)
  • रशियाची ग्लोनास (GLONASS )
  • तर 'गॅलिलीलो' हि युरोपिअन युनिअन ची यंत्रणा आहे

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत