Thursday, January 7, 2016

राज्य सेवा पूर्व परीक्षा – 2016 (109 पदे)

mpsc


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदाच्या भरतीकरीता आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2016 आयोजित करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी, गट-अ (एकूण 5 पदे), पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ (एकूण 16 पदे), सहायक विक्रीकर आयुक्त, गट-अ (एकूण 6 पदे), उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी, गट-अ (एकूण 6 पदे), सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ, (एकूण 8 पदे), मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद, गट अ (एकूण 2 पदे), तहसिलदार, गट-अ (एकूण 19 पदे), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब (एकूण 1 पद), कक्ष अधिकारी, गट-ब (एकूण 20 पदे), सहायक गट विकास अधिकारी, गट-ब (एकूण ५ पदे), सहायक निबंधक सहकारी संस्था, गट-ब (एकूण ८ पदे), उप अधीक्षक, भूमी अभिलेख, गट ब (एकूण १ पद), उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण २ पदे) नायब तहसिलदार, गट-ब (एकूण १० पदे) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १२ जानेवारी २०१६ आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in तसेच https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.