Sunday, January 12, 2014

Current Affairs in Marathi - 13 Jan 2014


प्रश्नमंजुषा -464
चालू घडामोडी MPSC Prelim Special Quiz-11 (13 जानेवारी 2014)
1. ‘स्वराज्य’ हे पुस्तक कोणी लिहीले आहे ?

A. अण्णा हजारे
B. अरविंद केजरीवाल
C. मनिष सिसोरिया
D. किरण बेदी

Click for answer 

B. अरविंद केजरीवाल
2. रघुराम राजन पॅनलने प्रस्तावित केलेल्या घटकराज्यांच्या वर्गीकरणाप्रमाणे खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही

A. बिहार ----- अत्यल्प विकसित
B. ओडिशा ----- विशेष दर्जा
C. गुजरात ------ अल्पविकसित
D. महाराष्ट्र ----- तुलनात्मक दृष्ट्या विकसित

Click for answer 

B. ओडिशा ----- विशेष दर्जा
स्पष्टीकरण: रघुराम राजन पॅनलने 3 गटात राज्यांची विभागणी केली.
0.6 पेक्षा जास्त इंडेक्स तुलनात्मक दृष्ट्या विकसित राज्ये दर्शवितो, तर 0.4 ते 0.6 इतका इंडेक्स हा अल्पविकसित आणि 0.4 पेक्षा कमी हे अत्यल्प विकसित राज्ये दर्शवितात. पॅनलमध्ये वर्गीकरण केल्याप्रमाणे राज्ये व दर्जा पुढीलप्रमाणे :
I. अत्यल्प विकसित – ओडीशा, बिहार, MP, छत्तीसगड, झारखंड, अरूणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, उत्तरप्रदेश, राजस्थान.
II. अल्प विकसीत राह्ये – मणिपूर, प. बंगाल, नागालँड, आंध्रप्रदेश, जम्मू आणि काश्मीर मिझोराम, गुजरात, त्रिपुरा, कर्नाटक, सिक्कीम आणि हिमाचल प्रदेश.
III. तुलनात्मक दृष्ट्या विकसित राज्ये – महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, केरळ व गोवा.
3. भारतीय सिनेमाचे पहिले म्युझियम कोठे उभारले आहे?

A. नागपूर
B. कोल्हापूर
C. मुंबई
D. नाशिक

Click for answer 

C. मुंबई
4. 2014 ची 20 वी जागतिक एड्स परिषद कोठे होणार आहे?

A. मेलबॉर्न (ऑस्ट्रेलिया)
B. हैदराबाद (भारत)
C. कोलंबो (श्रीलंका)
D. (सुदान)

Click for answer 

A. मेलबॉर्न (ऑस्ट्रेलिया)
5. खालीलपैकी कोणत्या टेनिस स्पर्धेला 2012 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली?

A. अमेरिकन ओपन
B. विम्बल्डन ओपन
C. फ्रेंच ओपन
D. ऑस्ट्रेलिया ओपन

Click for answer 

D. ऑस्ट्रेलिया ओपन
6. ‘निर्भय’ काय आहे?

A. भारत विकसित करत असलेले सुपरसोनिक क्षेपणास्त्र
B. भारताचा स्वयं निर्मित रणगाडा
C. मुलींसाठी स्वतंत्र कृतीरक्षक दल
D. वरीलपैकी काहीही नाही

Click for answer 

A. भारत विकसित करत असलेले सुपरसोनिया क्षेपणास्त्र
7. ‘टाइम इंटरनॅशनल’ चे संपादक म्हणून 2013 मध्ये पहिल्यांदाच गैर – अमेरीकी व्यक्ती नेमली गेली ही व्यक्ती कोण?

A. बॉबी घोष
B. शिरीश पारीख
C. अच्युत सामंत
D. मनिष तिवारी

Click for answer 

A. बॉबी घोष
8. 2012 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान केला गेला?

A. प्रेम चोप्रा
B. प्राण
C. सौमित्र चटर्जी
D. के. बालचंदेर

Click for answer 

B. प्राण
9. 2013 मध्ये कोणत्या भारतीय मुळाच्या उद्योगपतीने ‘Hypo Alpe Adria’ ही ऑस्ट्रेलियन बँक विकत घेतली?

A. लक्ष्मी मित्तल
B. संजीव कनोरीया
C. श्रीकांत श्रीनिवासन
D. अच्युत सामंत

Click for answer 

B. संजीव कनोरीया
10. 2011 मध्ये महाराष्ट्र शासनाने राज्याचे 'व्यसनमुक्ती' धोरण जाहीर केले. असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य ठरले ?

A. पहिले
B. दुसरे
C. तिसरे
D. चौथे

Click for answer 

A. पहिले


Strongly Recommended
ह्या विशेष प्रश्नमंजुषासोबतच फेब्रुवारी 2013 पासून (प्रश्नमंजुषा -351 पासून पुढे) ह्या ब्लॉगवर प्रकाशित केलेल्या प्रश्नमंजुषा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 साठी अभ्यासणे निश्चितपणे उपयुक्त ठरेल.

ही प्रश्नमंजुषा PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी ह्याच संकेतस्थळाच्या मुख्य पानावरील "Marathi General Knowledge in PDF " ह्या सेक्शनला भेट द्या.

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत