Thursday, August 1, 2013

प्रश्नमंजुषा - 1 ऑगस्ट 2013


प्रश्नमंजुषा -402

1. ‘द कक्कूझ कॉलिंग’ ही कादंबरी कोणी लिहिली आहे ?

A. जे.के.रॉलिंग
B. फादर स्टीफन्स
C. डॅन ब्राऊन
D. विक्रम सेठ

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. जे.के.रॉलिंग

स्पष्टीकरण: ‘द कक्कूझ कॉलिंग’ ही कादंबरी आपणच लिहिल्याचा दावा जे. के. रॉलिंग यांनी केल्यानंतर त्यावर वाचकांच्या एकच उड्या पडल्या आणि अचानक मागणी वाढल्याने प्रकाशकांना ते पुरविणे कठीण झाले.
‘द कक्कूझ कॉलिंग’ ही हेरगिरीवरील कादंबरी रॉबर्ट गेलब्रेथ या लेखकाच्या नावाने प्रकाशित झाली होती. या कादंबरीवरील समीक्षादेखील सकारात्मक होती; परंतु लेखकांचे नाव साहित्य क्षेत्रासाठी अनोळखी असल्याने या कादंबरीकडे फारसे कुणी लक्ष दिले नव्हते. त्यामुळे या पुस्तकाच्या न विकलेल्या प्रती प्रकाशकाकडे परत पाठविण्याबद्दल विक्रेते विचार करीत होते. एप्रिलमध्ये पुस्तक प्रकाशित झाल्यापासून अमेरिकेत केवळ ५00 प्रत विकल्या गेल्या होत्या, असे नेल्सन बूकस्कॅनने म्हटले आहे. प्रसिद्ध लेखिका जे. के. रॉलिंग यांनी या कादंबरीचे लेखक कुणी लष्करी अधिकारी नसून आपण आहोत, असे गेल्या आठवड्याच्या अखेरीस ‘द संडे टाइम्स ऑफ लंडन’ला सांगितले होते.
2. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतीय वंशाच्या ________________ यांचे अलीकडेच दक्षिण व मध्य आशियाच्या सहायक परराष्ट्रमंत्री म्हणून नामांकन केले आहे.

A. निशा देसाई बिस्वाल
B. माया बर्हाणपूरकर
C. सुनेत्रा गुप्ता
D. सचिन देव पविथरन

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. निशा देसाई बिस्वाल
3. भारताचे पाकिस्तानातील नवे उच्चायुक्त कोण आहेत ?

A. टीसीए राघवन
B. मीरा शंकर
C. पंकज सरन
D. डॉ. जयशंकर

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. टीसीए राघवन
4. सविता हलप्पनवार या भारतीय डेन्टिस्ट महिलेचा गर्भपातामुळे मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जगात उठलेल्या संतप्त प्रतिक्रियेनंतर कॅथॉलिक देश असणार्‍या कोणत्या देशाने मातेचा जीव धोक्यात असेल तर गर्भपात करण्यास मंजुरी दिली असून, येथील संसदेने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे?

A. आयर्लंड
B. बेल्जियम
C. इटली
D. चिली

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. आयर्लंड

स्पष्टीकरण: कॅथॉलिक देश असणार्‍या आयर्लंडने मातेचा जीव धोक्यात असेल तर गर्भपात करण्यास मंजुरी दिली असून, येथील संसदेने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. सविता हलप्पनवार या भारतीय डेन्टिस्ट महिलेचा गर्भपातामुळे मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जगात उठलेल्या संतप्त प्रतिक्रियेनंतर हा निर्णय झाला आहे. सविताला एका अर्थाने हा न्याय मिळाला आहे.
भारतीय दंतवैद्यक महिला सविता हलप्पनवार हिचा गर्भपात होत असतानाही तिचा गर्भ काढून टाकण्यास डॉक्टरांनी नकार दिल्यामुळे सविताचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण जगभर उठलेल्या संतप्त प्रतिक्रियांनंतर आयरिश सरकारने हे विधेयक तयार केले होते. गर्भपाताच्या प्रक्रियेत रक्तात विष मिसळल्याने सविताचा गॅलावे विद्यापीठाच्या रुग्णालयात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मृत्यू झाला. यामुळे आयर्लंडच्या गर्भपातविरोधी कायद्यात सुधारणा करण्याची निकड असल्याचे स्पष्ट झाले होते.
5. ब्रिटिश युवराज्ञी केटचे बाळंतपण करणार्‍या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकात कोणत्या मराठी डॉक्टरचाही समावेश होता?

A. डॉ.सुनीत विनोद गोडांबे
B. डॉ.के.एल.बोरा
C. डॉ.दत्तात्रेय कुळकर्णी
D. डॉ.शरद काळे

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. डॉ. सुनीत विनोद गोडांबे
6. कोणत्या देशात तेथील राजे अल्बर्ट दुसरे यांनी देशाचे प्रमुखपद सोडल्यानंतर राजे फिलिप यांनी संसदेत राजेपदाची शपथ घेतली?

A. कॅनडा
B. बेल्जियम
C. फिलिपाईन्स
D. रोमानिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. बेल्जियम

स्पष्टीकरण: पंतप्रधान इलिओ डी रूपो यांच्या उपस्थितीत अल्बर्ट यांनी राजेपदाचे अधिकार फिलिप यांना बहाल केले. बेल्जियमची राणी मॅथील्ड आणि त्यांचे पती किंग फिलिप यांनी लोकांना हात उंचावून अभिवादन केले.
183 वर्षांची सांसदीय लोकशाहीची परंपरा आहे बेल्जियममध्ये. सर्व राजकीय अधिकार पंतप्रधानांकडे आहेत.
7. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष _____________ 22 जुलै 2013 पासून तीन दिवसांच्या भारत भेटीवर आले होते .

A. अल गोर
B. जोए बिडेन
C. नेल्सन रॉकफेलर
D. जॉन केरी

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. जोए बिडेन
8. नोव्हेंबर 2012 मध्ये 'एसिआन' या आग्नेय आशियातील 10 देशांच्या संघटनेची शिखर परिषद _____________ची राजधानी नॉम पेन्ह येथे पार पडली.

A. व्हिएतनाम
B. थायलंड
C. लाओस
D. कंबोडिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

D. कंबोडिया
9. अफगाणिस्तानातील पहिल्या महिला गव्हर्नर (बामियान प्रांताच्या गव्हर्नर) __________ यांना या वर्षीचा मॅगसेसे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

A. अर्नेस्टो डॉमिंगो
B. सदाफ रहिमी
C. लेहपाई सॅग रॉ
D. डॉ. हबीबा सराबी

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

D. डॉ. हबीबा सराबी
10. नेपाळमधील मानवी तस्करीविरोधात काम करणाऱ्या ____________ चाही या वर्षीच्या मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.

A. पशुपतीनाथ समुदाय
B. नेपाळी अस्मिता मंच
C. शक्ती समूह
D. पाशमुक्त समूह

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. शक्ती समूह