Wednesday, July 10, 2013

प्रश्नमंजुषा - 10 जुलै 2013


प्रश्नमंजुषा -393

1. सिक्कीमचे राज्यपाल म्हणून कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्त्वाची अलीकडेच नियुक्ती झाली?

A. सतेज पाटील
B. शिवराज पाटील
C. श्रीनिवास पाटील
D. डी.वाय.पाटील

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. श्रीनिवास पाटील
2. खालील महाराष्ट्रीयन व्यक्ती व ते सध्या राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले राज्य यांच्या अचूक जोड्या जुळवा.


i) श्रीनिवास पाटील a) सिक्कीम
ii) शिवराज पाटील b) झारखंड
iii) डी. वाय. पाटील c) पंजाब
iv) डॉ. सय्यद अहमद d) बिहार


A. i - a, ii - b, iii- c, iv -d
B. i - a, ii - c, iii- b, iv - d
C. i - a, ii - c, iii- d, iv - b
D. i - a, ii - b, iii- d, iv - c

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. i - a, ii - c, iii- d, iv - b
3. भारताने सोडलेला पहिला दिशादर्शनासाठी पूर्णपणे वाहीलेला पहिला उपग्रह कोणता?

A. सरल
B. मेघाट्रॉपीवस
C. आयआरएनएसएस-1 ए
D. मेटसॅट

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. आयआरएनएसएस-1 ए
स्पष्टीकरण : आयआरएनएसएस - 1 ए च्या प्रेक्षपणाने भारताने स्वतःची जागतिक स्थाननिश्चिती तंत्रज्ञान (GPS) प्रणाली साठीचे पहिले पाउल उचलले. भारताकडून दिशादर्शनासाठी अवकाशात सात उपग्रहांची मालिका 2015 पर्यंत सोडली जाणार आहे.
4. खालील जागतिक स्थाननिश्चित प्रणाली व त्यासंबाधीत देश यांच्या अचूक जोड्या जुळवा.


i) रशिया a) ग्लोनास
ii) युरोपियन देश b) गॅलिलिओ
iii) जपान c) क्वासी झेनिथ
iv) चीन d) बैदू


A. i - a, ii - b, iii - c, iv - d
B. i - b, ii - a, iii - d, iv - c
C. i - b, ii - a, iii - c, iv - d
D. i - a, ii - b, iii - d, iv - c

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. i - a, ii - b, iii - c, iv - d
5. डग एंजेलबर्ट यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांना कोणत्या उपकरणाच्या शोधाचे श्रेय दिले जाते?

A. संगणक कीबोर्ड
B. संगणक माऊस
C. संगणक टचस्क्रीन
D. संगणक प्रणाली ( Operating System)

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. संगणक माऊस
6. भारताच्या परराष्ट्र सचिवपदी कोणत्या महिला अधिकार्‍याची निवड अलीकडेच निश्चीत झाली? त्या या पदाचा कार्यभार 1 ऑगस्ट 2013 पासून सांभाळतील.

A. चोकीला अय्यर
B. निरुपमा राव
C. सुजाता सिंग
D. नीला सत्यनारायण

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. सुजाता सिंग
7. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांना पदच्युत केल्यानंतर आता पंतप्रधान पदाची सुत्रे कोणी हाती घेतली आहेत?

A. डेव्हिड कॅमरून
B. केव्हीन रूड
C. ख्रिस वॉटसन
D. क्वेन्टिन ब्राइस

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. केव्हीन रूड
8. 18 जुलै 2013 पासून भारताच्या 40 व्या सरन्यायाधीशपदी खालीलपैकी कोण विराजमान होईल?

A. न्यायमूर्ति श्री ए.के.पटनाईक
B. न्यायमूर्ति श्री पी.सतशिवम
C. न्यायमूर्ति श्री हेमंत गोखले
D. न्यायमूर्ति श्री अल्तमस कबीर

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. न्यायमूर्ति श्री पी.सतशिवम
9. अमेरीकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी बराक ओबामा प्रशासनाने 1 जुलै 2013 पासून खालीलपैकी कोणाची नियुक्ती केली?

A. कोंडालिसा राईस
B. हिलरी क्लिंटन
C. सुझान राइस
D. मिशेल ओबामा

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. सुझान राइस
10. रवींद्रनाथ टागोर यांच्या 'गीतांजली' ह्या काव्यसंग्रहाबद्दल त्यांना या ____________ वर्षी 'नोबेल पारितोषिक' ने गौरविले गेले.

A. 1909
B. 1913
C. 1929
D. 1939

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. 1913
स्पष्टीकरण : 1913 साली प्राप्त झालेल्या भारताच्या पहिल्या वहील्या नोबेल पुरस्कारास या वर्षी 100 वर्षं पूर्ण झाली.-