Tuesday, April 24, 2012

प्रश्नमंजुषा -244


1. चंद्रावर जीवाचे अस्तित्व आढळत नाही कारण __________________
A. चंद्र पृथ्वी पासून दूर आहे .
B. चंद्राच्या विविध कला होतात .
C. चंद्राची नेहमी एकच बाजू पृथ्वी कडे असते .
D. चंद्रावरील तापमान विषम आहे .

Click for answer 

D. चंद्रावरील तापमान विषम आहे .

2.सूर्यकूल म्हणजे काय ?
A. सूर्य व त्याचे ग्रह
B. सूर्य व सूर्याचे उपग्रह
C. सूर्य व सूर्याचे लघुग्रह
D. सूर्य , सूर्याचे ग्रह , त्यांचे उपग्रह व लघुग्रह .

Click for answer 

D. सूर्य , सूर्याचे ग्रह , त्यांचे उपग्रह व लघुग्रह .

3. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
A. 21 मार्च
B. 21 जून
C. 23 सप्टेंबर
D. 21 डिसेंबर

Click for answer 

B. 21 जून

4. ' मध्यरात्रीच्या सूर्याचा देश ' कोणत्या देशाला म्हणतात ?
A. जपान
B. ग्रीनलंड
C. नार्वे
D. ऑस्ट्रेलिया

Click for answer 

C. नार्वे

5.महाराष्ट्रातील कोणती जागा चिक्कू या फळपिकासाठी प्रसिद्ध आहे ?
A. वेंगुर्ले
B. मेहरून
C. नाशिक
D. घोलवड

Click for answer 

D. घोलवड

6. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. नागपूर
B. चंद्रपूर
C. अमरावती
D. सांगली

Click for answer 

C. अमरावती

7. ' खडकवासला ' धरण कोणत्या नदीवर आहे ?
A. गोदावरी
B. मुळा
C. भीमा
D. वैतरणा

Click for answer 

B. मुळा

8. ' अनेर ' पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. अहमदनगर
B. रायगड
C. चंद्रपूर
D. धुळे

Click for answer 

D. धुळे

9. महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात उंच पर्वत शिखर कोणते ?
A. ब्रम्हगिरी
B. कळसूबाई
C. साल्हेर
D. त्र्यंबकेश्वर

Click for answer 

C. साल्हेर

10. 'वाल्मी' या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
A. नाशिक
B. औरंगाबाद
C. नागपूर
D. पुणे

Click for answer 

B. औरंगाबाद
स्पष्टीकरण : वाल्मी म्हणजे Water and Land Management Institute अर्थात ' जल व भूमी व्यवस्थापन संस्था ' औरंगाबाद शहरात आहे .
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -244”

Friday, April 20, 2012

प्रश्नमंजुषा -243


1. सम्राट अशोकाची राजधानी कोठे वसलेली होती ?
A. पाटलीपुत्र
B. नालंदा
C. सारनाथ
D. वैशाली

Click for answer 

A. पाटलीपुत्र

2.पानीपतच्या तीन लढाया कधी लढल्या गेल्या ?
A. 1526, 1556, 1761
B. 1526, 1550, 1780
C. 1556, 1670, 1761
D. 1761, 1809, 1810

Click for answer 

A. 1526, 1556, 1761

3. भारत छोडो चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली ?
A. 1921
B. 1940
C. 1930
D. 1942

Click for answer 

D. 1942

4. मुस्लीम लीगने कोणत्या वर्षी पाकीस्तानची औपचारीकरीत्या पहिल्यांदा मागणी केली ?
A. 1905
B. 1921
C. 1940
D. 1945

Click for answer 

C. 1940

5. भारतातील सर्वात जुने वृत्तपत्र कोणते ?
A. द हिंदू
B. अमृत बझार पत्रिका
C. द इंडीयन एक्सप्रेस
D. द स्टेट्समन

Click for answer 

B. अमृत बझार पत्रिका

6. यक्षगान कोणत्या राज्याचे नृत्य आहे ?
A. कर्नाटक
B. केरळ
C. ओरीसा
D. प. बंगाल

Click for answer 

A. कर्नाटक

7. ' बॉम्बचे तत्त्वज्ञान ' ( The Philosophy of the Bomb ) हा ग्रंथ कोणी लिहीला ?
A. भगतसिंग
B. चंद्रशेखर आझाद
C. बटुकेश्वर दत्त
D. सेनापती बापट

Click for answer 

B. चंद्रशेखर आझाद

8. 'द व्हर्नाकुलर प्रेस अ‍ॅक्ट ' कोणत्या वर्षी संमत झाला ?
A. 1870
B. 1874
C. 1878
D. 1890

Click for answer 

C. 1878

9. ' इंडीयन असोशिएशन ' या संघटनेची स्थापना कोठे झाली ?
A. पुणे
B. मुंबई
C. कोलकता
D. नागपूर

Click for answer 

C. कोलकता

10. ' नीलदर्पण ' या नाटकाचे लेखन कोणी केले ?
A. बंकिमचंद्र चटर्जी
B. रविंद्रनाथ टागोर
C. दीनबंधू मित्रा
D. इक्बाल

Click for answer 

C. दीनबंधू मित्रा
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -243”

कालच्या वृत्तपत्रात आलेली 'सहाय्यक (ASST)'पदासाठीची जाहिरात

सविस्तर वाचा...... “कालच्या वृत्तपत्रात आलेली 'सहाय्यक (ASST)'पदासाठीची जाहिरात”

प्रश्नमंजुषा -242


1. हरीत क्रांतीमुळे खालीलपैकी काय घडले ?
A. गहू पिकासाठी सर्वाधिक लाभ झाला .
B. क्षेत्रीय असमतोलात वाढ झाली .
C. भिन्न लोकांमधील उत्पन्नातील तफावत वाढली .
D. वरील सर्व

Click for answer 

D. वरील सर्व

2.' पंचायत राज ' व्यवस्थेमुळे कोठल्या स्वरूपाच्या नियोजनात मदत मिळाली ?
A. सूचक नियोजन ( Indicative Planning )
B. संरचनात्मक नियोजन ( Structural Planning)
C. भिन्न पातळींवरील नियोजन ( Multilevel Planning )
D. कार्यात्मक नियोजन ( Functional Planning )

Click for answer 

C. भिन्न पातळींवरील नियोजन ( Multilevel Planning )

3. केंद्र सरकारने नव्याने निश्चीत केलेले भारतातील किमान वेतन किती ?
A. 97 रु.
B. 127 रु.
C. 215 रु.
D. 180 रु.

Click for answer 

B. 127 रु.

4. लोकलेखा समिती कोणत्या वर्षापासून अस्तीत्वात आली ?
A. 1921
B. 1935
C. 1947
D. 1951

Click for answer 

A. 1921

5. लोकलेखा समितीचा कार्यकाल किती असतो ?
A. 6 महिने
B. 1 वर्ष
C. 2 वर्ष
D. 5 वर्ष

Click for answer 

B. 1 वर्ष

6.भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या स्वरुपाची आहे ?
A. साम्यवादी
B. समाजवादी
C. भांडवलशाही
D. मिश्र

Click for answer 

D. मिश्र

7. भारतात देशव्यापी पहिली आर्थीक गणना कोणत्या वर्षी झाली ?
A. 1951
B. 1965
C. 1977
D. 1991

Click for answer 

C. 1977

8. वित्त आयोगाची स्थापना भारतात कोण करते ?
A. पंतप्रधान
B. लोकसभा अध्यक्ष
C. अर्थमंत्री
D. राष्ट्रपती

Click for answer 

D. राष्ट्रपती

9. ' ATM ' ची सुविधा भारतात सर्वप्रथम कोणत्या व्यापारी बँकेने दिली ?
A. स्टेट बँक ऑफ इंडीया
B. सेंट्रल बँक ऑफ इंडीया
C. आय सी आय सी आय बँक
D. एच डी एफ सी बँक

Click for answer 

C. आय सी आय सी आय बँक

10. संकुचित पैसा ( Narrow Money ) कशाने दर्शविला जातो ?
A. M 1
B. M 2
C. M 3
D. M 4

Click for answer 

A. M 1
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -242”

Wednesday, April 18, 2012

प्रश्नमंजुषा -241


1. 'सोलर सेल' _______________ ऊर्जा चे रूपांतर _________________ ऊर्जेत मध्ये करतात .
A. उष्णता, प्रकाश
B. फोटो-व्होल्टाईक, प्रकाश
C. प्रकाश, विद्युत
D. प्रकाश, उष्णता

Click for answer 

C. प्रकाश , विद्युत

2.खालीलपैकी कोणत्या संप्रेरकामध्ये ( Harmone ) आयोडीन असते ?
A. इन्शुलीन
B. टेस्टोस्टेरॉन
C. थायरॉक्सीन
D. अ‍ॅड्रेनालाइन

Click for answer 

C. थायरॉक्सीन

3. 'निशांत ' काय आहे ? A. भारताने स्वतः तयार केलेला रणगाडा
B. मानवरहीत विमान
C. भारताची आण्वीक पाणबुडी
D. अंटार्क्टीकावरील संशोधन केंद्र

Click for answer 

B. मानवरहीत विमान

4. भारताने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास केव्हापासून बंदी घातली ?
A. जानेवारी 2007
B. ऑक्टोबर 2007
C. जानेवारी 2008
D. ऑक्टोबर 2008

Click for answer 

D. ऑक्टोबर 2008

5. NRHM (एन.आर.एच.एम.) कसले संक्षिप्त रूप आहे ?
A. नॉन रुरल हेल्थ मिशन
B. नॅशनल रुरल हेल्थ मिशन
C. नॅशनल रेसिडेंशियल हाऊसिंग मिशन
D. नॅचरल रुरल हाऊसिंग मटेरीयल

Click for answer 

B. नॅशनल रुरल हेल्थ मिशन

6. बेरियम , स्ट्रानशिअम इ. धातूंच्या संयुगांचा वापर शोभेच्या दारूकामात कशासाठी केला जातो ?
A. आवाज वाढावा यासाठी
B. आवाज प्रदूषण कमी व्हावे यासाठी
C. फटाका लवकर पेटावा म्हणून
D. विविध रंगछटा दिसण्यासाठी

Click for answer 

D. विविध रंगछटा दिसण्यासाठी

7. सौर शक्तीवर चालणारा भारतातील सर्वात मोठा दूरदर्शक ( Telescope ) कोणत्या वर्षी कार्यान्वीत होणे अपेक्षित आहे ?
A. 2011
B. 2013
C. 2015
D. 2020

Click for answer 

B. 2013

8. ______________ ही संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली अणुभट्टी होय .
A. अप्सरा
B. पूर्णीमा-I
C. ध्रुव
D. कामीनी

Click for answer 

C. ध्रुव

9. सेबिन (Sebin) ही पोलीओवरील लस कशाप्रकारे दिली जाते?
A. तोंडाद्वारे
B. इंजेक्शनद्वारे
C. दुधात मिसळून
D. वाफेद्वारे

Click for answer 

A. तोंडाद्वारे

10. 'गोवर' हा कोणत्या स्वरूपाचा आजार/रोग आहे ?
A. एकपेशीय आदीजीवांपासून होणारा रोग
B. जीवाणूजन्य रोग
C. विषाणूजन्य रोग
D. असंसर्गजन्य रोग

Click for answer 

C. विषाणूजन्य रोग
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -241”

Monday, April 16, 2012

प्रश्नमंजुषा -240


1. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्य घटना कोणी स्वीकारली ?
A. ब्रिटीश संसंदेने
B. भारतीय संसद
C. केंद्रीय मंत्रीमंडळ
D. भारताचे नागरीक

Click for answer 

D. भारताचे नागरीक

2.भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये प्रौढ मतदानाची तरतूद करण्यात आली ?
A. कलम 144
B. कलम 323
C. कलम 326
D. कलम 123

Click for answer 

C. कलम 326

3. आर्थीक आणीबाणीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे ?
A. कलम 352
B. कलम 356
C. कलम 360
D. कलम 365

Click for answer 

C. कलम 360

4. फेरेलचा नियम कशाशी संबंधित आहे ?
A. वा‍र्‍यांची दिशा
B. वा‍र्‍यांचा वेग
C. पृथ्वीचे परिवलन
D. महासागरातील सागरप्रवाह
Click for answer 

A. वा‍र्‍यांची दिशा

5.जगातील सर्वाधीक दुभती जनावरे ( गाई, म्हशी ) कोणत्या देशात आहेत ?
A. अमेरिका
B. ऑस्ट्रेलिया
C. भारत
D. डेन्मार्क

Click for answer 

C. भारत

6. भारतात भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती सर्वप्रथम कोणत्या वर्षी झाली ?
A. 1935
B. 1947
C. 1951
D. 1956

Click for answer 

D. 1956

7.कल्पक्कम कोणत्या राज्यात आहे ?
A. कर्नाटक
B. तामीळनाडू
C. केरळ
D. उत्तरप्रदेश

Click for answer 

B. तामीळनाडू

8. पंडीत जवाहरलाल नेहरू ' भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ' अध्यक्ष किती वेळा होते ?
A. 1
B. 2
C. 3
D. 4

Click for answer 

C. 3

9. लाला लजपतराय यांच्यावर झालेल्या लाठीहल्ल्यातील गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला कोठे झाला होता ?
A. मुंबई
B. अमृतसर
C. कराची
D. लाहोर

Click for answer 

D. लाहोर

10. पुणे ते विजयवाडा ( सोलापूर , हैद्राबादमार्ग ) कोणता राष्ट्रीय मार्ग आहे ?
A. राष्ट्रीय महामार्ग क्र. 3
B. राष्ट्रीय महामार्ग क्र. 4B
C. राष्ट्रीय महामार्ग क्र. 9
D. राष्ट्रीय महामार्ग क्र.13

Click for answer 

C. राष्ट्रीय महामार्ग क्र. 9
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -240”

Sunday, April 15, 2012

प्रश्नमंजुषा -239सर्व स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी/सामान्य ज्ञान घटकासाठी उपयुक्त

1. मार्च 2012 मध्ये ' ग्रामीण विकास , पिण्याचे पाणी व स्वच्छता ' या विभागाचे केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी संत गाडगेबाबा यांच्या नावाने एका राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा केली . हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जाईल ?
A. मृदू संधारण
B. वने व वनविकास
C. तंटामुक्ती
D. स्वच्छता व पाणी
Click for answer 

D. स्वच्छता व पाणी

2. वरील घोषणेसोबतच माननीय मंत्री महोदयांनी कोणत्या गावातील महिला भारतभर विशेषतः बिहार , छत्तीसगढ , उत्तरप्रदेश इ. राज्यांमध्ये ' निर्मल ग्राम दूत ' म्हणून जाऊन कार्य करतील असा प्रस्ताव ठेवला ?
A. राळेगण सिद्धी
B. हिवरे बाजार
C. तासगाव
D. पळसखेड
Click for answer 

B. हिवरे बाजार

3. निर्मल ग्राम योजनेंतंर्गंत सर्वाधीक स्वच्छ गावांची एकूण संख्या कोणत्या राज्यात आहे ?
A. सिक्कीम
B. महाराष्ट्र
C. मध्यप्रदेश
D. केरळ

Click for answer 

B. महाराष्ट्र

4. 2012 चा टेम्पलटन पुरस्कार कोणाला प्राप्त झाला ?
A. मनमोहन सिंग
B. दलाई लामा
C. रामदेव बाबा
D. अण्णा हजारे

Click for answer 

B. दलाई लामा

5. सोमालिया व उत्तर केनियातील अलिकडील दुष्काळाला कोणती घटना मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असल्याचा निष्कर्ष निघाला ?
A. ला निना
B. जंगली वणवे
C. स्थलांतरीत शेती
D. वृक्षतोड

Click for answer 

A. ला निना

6. ' गीताई ' चे लेखक कोण आहेत ?
A. साने गुरुजी
B. लोकमान्य टिळक
C. विनोबा भावे
D. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

Click for answer 

C. विनोबा भावे

7. डिसेंबर 2010 मध्ये झालेल्या ' कृष्णा पाणी वाटप लवादा ' च्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाटेला किती पाणी आले ?
A. 1000 TMC
B. 666 TMC
C. 911 TMC
D. 585 TMC

Click for answer 

B. 666 TMC

8. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर सर्वाधीक (1123) आहे ?
A. मुंबई शहर
B. र‍त्ना‌गिरी
C. सिंधुदुर्ग
D. पुणे

Click for answer 

B. र‍त्ना‌गिरी

9. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात सर्वाधीक हिस्सा कोणत्या क्षेत्राचा आहे ?
A. कृषी
B. उद्योग
C. सेवा
D. वरील सर्वांचा हिस्सा सारखाच आहे .

Click for answer 

C. सेवा

10.गीता कुमारी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बुध्दीबळ
B. नेमबाजी
C. टेबल टेनिस
D. कुस्ती ( महिला )

Click for answer 

D. कुस्ती ( महिला )
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -239”

Tuesday, April 10, 2012

प्रश्नमंजुषा -238


1. भारत सरकारने जाहीर केलेल्या ' हवामान - बदल कृती योजना ' ( Climate Change Action Plan ) मध्ये किती राष्ट्रीय अभियानांचा समावेश आहे ?

A. चार
B. सहा
C. आठ
D. दहा

Click for answer 
C. आठ

2.भारत सरकारच्या हवामान - बदल कृती योजनेंतर्गंत जाहीर अभियानात खालीलपैकी कोणत्या अभियानांचा समावेश आहे ?

A. राष्ट्रीय सौर अभियान
B. राष्ट्रीय जल अभियान
C. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान
D. वरील सर्व

Click for answer 
D. वरील सर्व

3. खालीलपैकी कोणता करार हा पर्यावरण संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याने क्लोरोफ्ल्युरोकार्बनचा वापर निश्चीत वेळापत्रकाने रोखण्यासाठी कटीबद्ध आहे ?

A. पॅरीस करार
B. वार्सा करार
C. जिनेव्हा करार
D. माँट्रीयल करार

Click for answer 
D. माँट्रीयल करार

4. ' फोटोकेमिकल स्मॉग ' कोणत्या वायूच्या प्रदूषणामुळे तयार होतो ?

A. नायट्रीक ऑक्साईड
B. नायट्रस ऑक्साईड
C. हायड्रोजन सल्फाइड
D. अमोनिया

Click for answer 
A. नायट्रीक ऑक्साईड

5. जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो ?

A. 23 मार्च
B. 22 डिसेंबर
C. 22 एप्रिल
D. 5 जून

Click for answer 
C. 22 एप्रिल

6. पृथ्वीवरील वातावरणात ओझोनचा थर किती कि. मी. च्या मर्यादेत आढळतो ?

A. 0 ते 5 कि.मी.
B. 15 ते 25 कि.मी.
C. 25 ते 40 कि.मी.
D. 40 ते 80 कि.मी.

Click for answer 
C. 25 ते 40 कि.मी.

7. संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे कोणती नवीन पर्यावरणविषयक समस्या तयार झाली आहे ?

A. वायू प्रदूषण
B. जल प्रदूषण
C. व्हच्र्युअल कचरा
D. ई - कचरा

Click for answer 
D. ई - कचरा

8. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( NEERI - National Enviornmetal Engineering Research Institute ) कोणत्या शहरात आहे ?

A. मुंबई
B. नाशिक
C. औरंगाबाद
D. नागपूर

Click for answer 
D. नागपूर

9. राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

A. डॉ. मनमोहनसिंग
B. न्या. के. जी. बालकृष्णन
C. डॉ. एम. एस. स्वामीनाथन
D. न्या. बी. एन. कृपाल

Click for answer 
D. न्या. बी. एन. कृपाल

10. ' पाणी पंचायत ' ह्या संकल्पनेचे जनक कोण ?

A. विलासराव साळुंखे
B. अण्णा हजारे
C. डॉ. राजेंद्रसिंह
D. बाबा आमटे

Click for answer 
A. विलासराव साळुंखे
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -238”

Sunday, April 8, 2012

प्रश्नमंजुषा -237


1. ' ओरोस बुद्रुक ' हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे ?

A. रत्नागिरी
B. गडचिरोली
C. सिंधुदुर्ग
D. उस्मानाबाद

Click for answer 
C. सिंधुदुर्ग

2. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ?

A. मुंबई शहर
B. मुंबई उपनगर
C. ठाणे
D. वरील सर्व

Click for answer 
A. मुंबई शहर

3. ' महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ ' कोणत्या शहरात आहे ?

A. अहमदनगर
B. पुणे
C. गडचिरोली
D. नाशीक
Click for answer 
D. नाशीक

4. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे ?

A. ओडीसा
B. छत्तीसगढ
C. मध्यप्रदेश
D. झारखंड

Click for answer 
B. छत्तीसगढ

5.1906 साली टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांची वकीली कोणी केली ?

A. पं. मोतीलाल नेहरू
B. बॅरीस्टर जीना
C. तेजबहदूर सप्रू
D. ग. वा. जोशी

Click for answer 
B. बॅरीस्टर जीना

6. ' मित्रमेळा ' ही संघटना वि. दा. सावरकर यांनी कोठे स्थापन केली ?

A. पुणे
B. नाशीक
C. लंडन
D. कानपूर

Click for answer 
B. नाशीक

7. 1916 च्या " ऐतिहासीक " लखनौ काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले ?

A. अंबिकाचरण मुजुमदार
B. लोकमान्य टिळक
C. दादाभाई नौरोजी
D. महात्मा गांधी
Click for answer 
A. अंबिकाचरण मुजुमदार

8. ' शेर - ए - पंजाब ' ह्या नावाने कोणते व्यक्तीमत्व ओळखले जाते ?

A. लाला लजपतराय
B. भगतसिंग
C. सरदार अजितसिंग
D. सुखदेव

Click for answer 
A. लाला लजपतराय

9. पहिले मराठा - इंग्रज युद्ध कोणत्या वर्षी झाले ?

A. 1857
B. 1775
C. 1817
D. 1818

Click for answer 
B. 1775

10. संथाळांचा उठाव कोठे झाला ?

A. बंगाल
B. महाराष्ट्र
C. हरीयाना
D. केरळ

Click for answer 
A. बंगाल
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -237”

Tuesday, April 3, 2012

प्रश्नमंजुषा -236


सर्व स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी/सामान्य ज्ञान घटकासाठी उपयुक्त

1. 2012-13 ह्या वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर करण्यात आला ?

A. 27 फेब्रुवारी 2012
B. 28 फेब्रुवारी 2012
C. 29 फेब्रुवारी 2012
D. 16 मार्च 2012

Click for answer 
D. 16 मार्च 2012

2.भारताचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत ?

A. दिनेश त्रिवेदी
B. पी. चिदंबरम
C. कमल नाथ
D. प्रणव मुखर्जी

Click for answer 
D. प्रणव मुखर्जी

3. खालीलपैकी कोणते भारतीय पंतप्रधानांनी अर्थमंत्री पदही भूषविले ?
अ. जवाहरलाल नेहरू
ब. मोरारजी देसाई
क. इंदीरा गांधी
ड. व्ही. पी. सिंग
ई. मनमोहन सिंग

A.अ, ब, क, ई
B. क, ड, ई
C. ब, ड, ई
D. अ, ब, क, ड, ई

Click for answer 
D. अ, ब, क, ड, ई

4. 2012-13 ह्या वर्षाचा महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्याचा अर्थंसंकल्प कोणी मांडला ?

A. श्री. अजित पवार
B. श्री. हर्षवर्धन देशमुख
C. श्री. सुनिल तटकरे
D. श्री. पृथ्वीराज चव्हाण
Click for answer 
A. श्री. अजित पवार

5. अलीकडेच प्रदान केलेल्या 2010 - 11 साठीच्या ' राष्ट्रीय पर्यटन पारितोषिकां ' मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या हॉस्पीटलला ' सर्वोत्कृष्ट वैद्यकीय पर्यटन सुविधा ' ( Best Medical Tourism Facility ) म्हणून गौरविण्यात आले ?

A. ससून रुग्णालय , पुणे
B. रुबी हॉल क्लिनीक , पुणे
C. के. इ. एम. मुंबई
D. जसलोक हॉस्पीटल , मुंबई

Click for answer 
B. रुबी हॉल क्लिनीक , पुणे

6. ब्रिक्स ( BRICS ) देशांची 4 थी परिषद कोठे पार पडली ?

A. सान्या , चीन
B. नवी दिल्ली , भारत
C. ब्राझीलिया , ब्राझील
D. मास्को , रशिया

Click for answer 
B. नवी दिल्ली , भारत

7. ' जागतिक मलेरीया दिन ' कोणत्या तारखेला साजरा करतात ?

A. 22 फेब्रुवारी
B. 23 मार्च
C. 22 एप्रिल
D. 25 एप्रिल

Click for answer 
D. 25 एप्रिल

8. अलीकडेच रीझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने बँकरेट वाढवून 9.5 % केला . ही वाढ किती कालावधीनंतर झाली ?

A. 6 महिने
B. 2 वर्ष
C. 5 वर्ष
D. 9 वर्ष

Click for answer 
D. 9 वर्ष

9. भारतीय जंगलांवरील 2011 च्या अहवालानुसार ( India State Forest Report 2011 ) भारतातील सर्वाधीक जंगलांचे एकूण क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ?

A. महाराष्ट्र
B. अरुणाचल प्रदेश
C. मध्यप्रदेश
D. हिमाचल प्रदेश

Click for answer 
C. मध्यप्रदेश

10. महाराष्ट्राच्या 2012 -13 च्या अर्थसंकल्पानुसार राज्य शासन कोणत्या शहरात ' मराठी भाषा भवन ' बांधण्याच्या विचारात आहे ?

A. नागपूर
B. नाशीक
C. पुणे
D. मुंबई

Click for answer 
D. मुंबई
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -236”