Wednesday, February 29, 2012

प्रश्नमंजुषा -218

अंकगणित विशेष प्रश्नमंजुषा -1

खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC Asst पूर्व परीक्षा
4. MPSC STI पूर्व परीक्षा
5. D.Ed. CET 2012

1.


A. 25
B. 50
C. 75
D. 1

Click for answer 
D. 12. 120 पैकी 65 टक्के मुले पास झाली, तर अनुत्तीर्ण विद्यार्थी किती ?

A. 52
B. 42
C. 50
D. 58

Click for answer 
B. 42
सर्वप्रथम लक्षात घेवू या कि येथे पास झालेल्या मुलांची टक्केवारी दिली आहे. पण विचारताना अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या विचारली आहे. तेव्हा, जर 65% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील तर (100-65)%=35% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असणार.

जर दर 100 पैकी 35 विद्यार्थी अनुत्तीर्ण असतील
तर 120 (एकूण विद्यार्थी संख्या) पैकी ‘ x ’ विद्यार्थी अनुत्तीर्ण असतील.
3. ________या संख्येच्या 5 पट व  8 पटीतील  फरक 27 येतो.

A.  9
B.  4
C.  6
D.  12

Click for answer 
A.  9

एक संख्या 'x' समजू .

'x' च्या 5 पट 5x तर 8 पट 8x होईल.

8 आणि 5 पटीतील फरक 27 आहे.

8x-5x=27

3x=27

x=27/3=94.


A.
           
B.
           
C.
         
        
D.
         
Click for answer 
B.
           5. 4 ही संख्या 0.2 च्या किती पट आहे ?

A. 20
B. 30
C. 10
D. 40

Click for answer 
A. 20
6. एक पेला आणि एक तांब्यात अनुक्रमे 150 मि.ली. व 165 मि.ली. पाणी भरते. 13 लिटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला आणि एक तांब्या भरून पाणी बाहेर काढल्यावर बादलीत किती पाणी उरते?

A. 12.685 ली.
B. 16.285 ली.
C. 18.265 ली.
D. 22.685 ली.

Click for answer 
A. 12.685 ली.

अशा स्वरूपाच्या गणितांमध्ये दिलेल्या राशीचे एकक समान असणे आवश्यक असते.

ह्या ठिकाणी उत्तर लिटर मध्ये अपेक्षित आहे म्हणून पेला आणि तांब्या यांचे एकक लिटर करणे जास्त संयुक्तिक होईल.

1 लिटर =1000 मिलीलीटर

म्हणून पेला आणि तांब्या यांच्यात अनुक्रमे 0.150 लिटर आणि 0.165 लिटर इतके पाणी भरेल.

13 लिटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला आणि एक तांब्या भरून पाणी बाहेर काढल्यावर बादलीत

13-(तांब्यात मावणारे पाणी + पेल्यात मावणारे पाणी )= 13-(0.165+0.150)=13-0.315= 12.685 ली. इतके पाणी उरते.7.
        

A. 12
B. 14
C. 16
D. 18

Click for answer 
A. 12

16 -8 + 4= ?

8+4=128. 2,6,12,20,30,... या क्रमाने येणारी पुढील संख्या कोणती ?

A. 34
B. 32
C. 42
D. 38

Click for answer 
C. 42

अश्या प्रकारे पुढील संख्येसाठी तो फरक 12 असेल. म्हणून उत्तर =30+12=429. विक्रमने त्याला मिळणार्‍या 15000  रुपये फायद्यातील 15 %  टक्के रक्कम मुलीच्या लग्नास आणि 45 % टक्के रक्कम घरखर्चासाठी वापरली, तर उरलेली रक्कम किती ?

A. 6000 रुपये
B. 6900 रुपये
C. 9000 रुपये
D. यापैकी नाही

Click for answer 
A. 6000 रुपये

विक्रमाला मिळालेली एकूण रक्कम 15000 रुपये . यापैकी 15 % +45 % =60 % रक्कम वापरली गेली. तर उरलेली रक्कम 100-60= 40 %.

15000 रुपयांच्या 40 % म्हणजेच


इतकी रक्कम शिल्लक राहील.


10. एका वस्तूची खरेदी किंमत 50 रुपये आहे व तिची विक्री किंमत 30 रुपये आहे, तर या व्यवहारात शेकडा तोटा किती झाला ?

A. 30
B. 40
C. 20
D. 60

Click for answer 
B. 40

50 रुपयांच्या खरेदीवर 20 रुपये तोटा झाला आहे.

(खरेदी 50 रुपये -विक्री 30 रुपये )


शेकडा तोटा काढण्यासाठी 100 रुपये खरेदीवर किती तोटा झाला हे पहाणे आवश्यक असते.

50 रुपयेवर 20रुपये तोटा तर 100 रुपये खरेदीवर 40 रुपये तोटा होईल.

म्हणून शेकडा तोटा 40 रुपये.सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -218”

Tuesday, February 28, 2012

प्रश्नमंजुषा -217


1. महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता 'इक्रिसॅट' तंत्र अवलंबिले जाते ?

A. बाजरी
B. ज्वारी
C. मका
D. भुईमूग

Click for answer 
D. भुईमूग

2.खालीलपैकी कोणते एक कडधान्याचे पिक तेलबियाचे पिक आहे ?

A. तूर
B. सोयाबीन
C. उडीद
D. चवळी
Click for answer 
B. सोयाबीन

3. खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे ?

A. वसंत
B. मालदांडी -35-1
C. दगडी
D. बेंद्री
Click for answer 
B. मालदांडी -35-1

4. महाराष्ट्रात जमिनीची धूप करणारा सर्वात महत्त्वाचा कारणीभूत घटक कोणता ?

A. प्राणी
B. वारा
C. पाऊस
D. मानव

Click for answer 
C. पाऊस

5. जमिनीची शक्यता निर्धारित उतार अथवा ढाळ कायम ठेऊन शेती मशागत उताराच्या आडव्या दिशेने करण्याची साधी सोपी सुटसुटीत पध्दतीस _______असे म्हणतात .

A. पट्टा पध्दत
B. समपातळीवरील पध्दत
C. बांध पध्दत
D. सामान्यतः मशागत पध्दत

Click for answer 
B. समपातळीवरील पध्दत


6. खालीलपैकी कोणत्या भाजीपासून सर्वात जास्त प्रथिने मिळतात ?

A. वाटाणा
B. गवार
C. घेवडा
D. चवळीच्या शेंगा

Click for answer 
A. वाटाणा

7. बाजारात मालाची रेलचेल टाळण्यासाठी व चांगली किंमत मिळण्यासाठी कांद्याची साठवण ________________ मध्ये करतात .

A. खड्डे
B. खेळती हवा असणारे गोदाम
C. दोन मजल्यात कांदे ठेवता येणारी हवा असणारे गोदाम
D. शीतगृहे


Click for answer 
C. दोन मजल्यात कांदे ठेवता येणारी हवा असणारे गोदाम

8. महाराष्ट्रात गव्हाचे सरासरी उत्पादन किती आहे ?

A. 877 किलो प्रति हेक्टर
B. 977किलो प्रति हेक्टर
C. 1077 किलो प्रति हेक्टर
D. 1177 किलो प्रति हेक्टर

Click for answer 
D. 1177 किलो प्रति हेक्टर

9. दोन किंवा जादा पिके एकाच वेळी परंतु ओळीचे बंधन न पाळता घेतली जातात त्या पिकपद्धतीला काय म्हणतात ?

A. बहुविध पिक पद्धती
B. आंतरपिक पद्धती
C. मिश्र पिक पद्धती
D. पिकपद्धती

Click for answer 
C. मिश्र पिक पद्धती

10. महाराष्ट्रात तृणधान्य पिकामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादन ____________या पिकाखाली आहे .

A. गहू
B. भात
C. ज्वारी
D. मका

Click for answer 
C. ज्वारी
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -217”

Monday, February 27, 2012

We Are Back
मित्रहो काही तांत्रिक कारणांमुळे आम्ही काही दिवस रेग्युलर अपडेट करू शकलो नाहीत त्या साठी दिलगीर आहोत.
पण आता आम्ही सज्ज आहोत , एका नव्या उमेदीने आणि उत्साहाने. मार्च महिन्यात राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जाहिरात येणे अपेक्षित आहे. (नक्की कधी ते आम्हालाही माहित नाही.) शिवाय महाराष्ट्र वनसेवा परीक्षेसाठी काही मित्र-मैत्रिणींनी 'फॉर्म ' भरलेही असतील.
तेव्हा अवघ्या काही तासात आम्ही नियमितपणे पूर्वीप्रमाणेच अपडेट देत राहू. आणि होय, आधीच नमूद केल्याप्रमाणे गणित आणि मानसिक क्षमता चाचणी साठी विशेष प्रश्नमंजुषाहि आणत आहोत. तेव्हा असाच लोभ राहू द्या, हेच आपल्याकडे मागणे.

सविस्तर वाचा...... “We Are Back”

Friday, February 24, 2012

प्रश्नमंजुषा -216


1. 'मूरघास' तयार करण्याकरिता कोणते पीक सर्वात जास्त उपयोगी आहे ?

A. ज्वारी
B. लसूणघास
C. बरसीम
D. मका

Click for answer 
C. बरसीम

2. हायब्रिड ज्वारीचे पीक फुला‍‍र्‍यावर येत असताना कणसावर कोणत्या भागाकडून प्रथम फुले येण्यास सुरुवात होते ?

A. कणसाच्या वरच्या टोकाकडून ( शेंड्याकडून )
B. कणसाच्या खालच्या बुडापासून
C. कणसाच्या मधल्या भागापासून
D. संपूर्ण कणसावर एकाच वेळी

Click for answer 
B. कणसाच्या खालच्या बुडापासून

3. कोणत्या राज्याचा ऊसाखालील क्षेत्रात पहिला क्रमांक व साखर उत्पादनात दुसरा क्रमांक आहे ?

A. कर्नाटक
B. तामिळनाडू
C. महाराष्ट्र
D. उत्तर प्रदेश
Click for answer 
D. उत्तर प्रदेश

4. रब्बी हंगामात कोणत्या गळीत धान्य पिकाखाली महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्र आहे ?

A. सूर्यफूल
B. करडई
C. तीळ
D. जवस

Click for answer 
B. करडई


5. पाण्याचा ताण सहन करणारे, कडक थंडीत येणारे व विम्ल जमिनीत येणारे कोणते तृणधान्य भारतात घेतात ?

A. गहू
B. सातू
C. बाजरी
D. ज्वारी

Click for answer 
B. सातू

6. कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते ?

A. गहू
B. भात
C. मका
D. ज्वारी

Click for answer 
C. मका

7. समपातळी रेषेप्रमाणे बांध खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घालावेत ?

A. जमिनीचा उतार 2 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास
B. जमिनीचा उतार 2 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास
C. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास
D. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास

Click for answer 
C. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास

8. भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली ?

A. 1950 - 51
B. 1961 - 62
C. 1975 - 76
D. 1966 - 67


Click for answer 
D. 1966 - 67

9. महाराष्ट्रात मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या गावी कार्यान्वित आहे ?

A. मांजरी
B. चास
C. मोहोळ
D. सोलापूर

Click for answer 
C. मोहोळ

10. खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते ?

A. सूर्यफूल
B. करडई
C. गहू
D. सोयाबीन


Click for answer 
A. सूर्यफूल
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -216”

Friday, February 17, 2012

प्रश्नमंजुषा -215


1. सि-डॅक(पुणे)यांनी सर्वात अलीकडे बनवलेल्या सुपर कॉम्प्यूटरचे नाव ______________.

A. परम-शौर्य
B. परम-युवा
C. परम-I
D. परम-II

Click for answer 
B. परम-युवा

2. यापैकी कोणत्या टेक्नोलॉजीचा 4G मध्ये समावेश होतो ?

A. यु.एल.बी.
B. एडज्
C. सीडीएमए
D. जीपीआरएस्

Click for answer 
A. यु.एल.बी.

3. सि-डॅकने शासनाच्या महसूल विभागासाठी स्टँप व रजिस्ट्रेशनची जी सिस्टिम बनवली त्याचे नाव ___________

A. एस.ए.आर.आई.टी.ए.
B. आर.ए.आर.आई.टी.ए.
C. आर.एस.आर.आई.टी.ए.
D. वरीलपैकी कोणतीही नाही

Click for answer 
A. एस.ए.आर.आई.टी.ए.(SARITA)

4. "नॅशनल टास्क फोर्स ऑन आय टी अँण्ड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट" ची स्थापना पंतप्रधान ऑफिसतर्फे ____________ या दिवशी झाली .


A. 22मे1997
B. 22मे1998
C. 22मे1999
D. 22मे2000

Click for answer 
B. 22मे1998

5. गूगल या सर्च इंजिन कंपनीचा 'ध्येयवाक्य' (motto) काय आहे?

A. डू नॉट बी ईव्हील
B. जस्ट डू इट
C. एव्हर टू एक्सेल
D. लाइव्ह फ्री ओर डाय

Click for answer 
A. डू नॉट बी ईव्हील
(तो सुचवला होता : अमित पटेल आणि पॉल बुच्चेत ह्या गुगल च्या अभियंत्यांनी )


6. सि-डॅक (पुणे) ने अलीकडे मानवी जीवशास्त्रीय माहिती संशोधनासाठी वेगाने 'प्रोसेस' करण्यासाठी कोणत्या नावाने 'सुपर काम्प्युटिंग क्लस्टर' विकसित केले आहे ?

A. बायोक्रोम
B. ह्यूमक्रोम
C. डीप ब्ल्यू
D. परम युवा

Click for answer 
A. बायोक्रोम

7. सि-डॅक (CDAC) ह्या संस्थेचे पूर्ण नाव काय आहे ?

A. Centre for Development of Advanced Computers
B. Centre for Development of Automatic Computing
C. Council of Development of Advanced Computing
D. Centre for Development of Advanced Computing

Click for answer 
D. Centre for Development of Advanced Computing अर्थात 'प्रगत संगणन विकास केंद्र'

8. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी 'नोबेल पारितोषिक ' देण्याचा स्पष्टपणे उल्लेख नाही ?

A. पदार्थविज्ञान
B. शांतता
C. वैद्यकीय संशोधन
D. अभियांत्रिकी संशोधन

Click for answer 
D. अभियांत्रिकी संशोधन

9. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला गौरविले जाते ?

A. डॉ.होमी भाभा
B. डॉ.विक्रम सेठना
C. डॉ.मेघनाद सहा
D. डॉ.विक्रम साराभाई

Click for answer 
D. डॉ.विक्रम साराभाई

10. इस्त्रोचे माजी चेअरमन जी.माधवन नायर यांच्या कार्यकाळातील कोणत्या कंपनीशी केलेला करार सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे ?

A. अंट्रिक्स
B. देवास
C. अरेवा
D. जनरल इलेक्ट्रिक

Click for answer 
B. देवास
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -215”

Thursday, February 16, 2012

प्रश्नमंजुषा -214


1. 2011 चा 'साहीत्य अकादमी ' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला ?

A. वार्‍याने हालते रान
B. राजपुत्र आणि डार्लिंग
C. संध्याकाळच्या कविता
D. चंद्रमाधवीचे प्रदेश

Click for answer 
A. वार्‍याने हालते रान

2.कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे ?

A. गोविंद विनायक करंदीकर
B. माणीक सीताराम गोडघाटे
C. गोविंद त्र्यंबक दरेकर
D. कृष्णाजी केशव दामले

Click for answer 
B. माणीक सीताराम गोडघाटे

3. विधानसभेत मोबाईलवर अश्‍लील क्लीप पाहत असल्याचे स्थानिक वृत्तवाहिनेने दाखविल्यानंतर ______________ राज्यातील तीन मंत्र्यांना अलीकडेच राजीनामे द्यावे लागले .

A. गोवा
B. महाराष्ट्र
C. हरियाणा
D. कर्नाटक

Click for answer 
D. कर्नाटक

4. अलीकडील काळात महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने कोणत्या कायद्याचे नाव बदलून ' महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ' असे सुधारीत नामकरण केले ?


A. संयुक्त महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949
B. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949
C. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949
D. बॉम्बे महानगरपालिका अधिनियम 1949

Click for answer 
C. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949

5. ' महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ' खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेला / महानगरपालिकांना वगळता महाराष्ट्रातील उर्वरीत सर्व महानगरपालिकांना लागू आहे ?

A. मुंबई मनपा
B. मुंबई मनपा, नवी मुंबई मनपा
C. मुंबई मनपा, नागपूर मनपा
D. मुंबई मनपा, नागपूर मनपा, ठाणे मनपा व नवी मुंबई मनपा

Click for answer 
A. मुंबई मनपा

6. ' महाराष्ट्र जिल्हा परीषद व पंचायत समिती अधिनियम 1961' मधील जि. प.सदस्य व पंचायत समिती सदस्यांना अपात्र ठरविण्यासंदर्भातील शौचालयाचे प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी पूर्वीच्या नव्वद दिवसांवरून बदलून आता किती करण्यात आला आहे ?

A. निवडणुकीचा अर्ज भरतानाच आवश्यक
B. तीन आठवडे
C. पंचेचाळीस दिवस
D. 1 वर्ष

Click for answer 
D. 1 वर्ष

7. नागपूर जिल्यातील ______________ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे .

A. गोरेवाडा
B. रामटेक
C. सावनेर
D. गोसीखुर्द

Click for answer 
A. गोरेवाडा

8. ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

A. महिला क्रिकेट
B. लॉन टेनिस
C. टेबल टेनिस
D. बॅडमिंटन

Click for answer 
D. बॅडमिंटन

9. मार्च 2012 मध्ये कोणत्या शहरात ' द न्युक्लीयर सिक्युरीटी समीट ' अर्थात 'आण्विक सुरक्षा परिषद ' होणे नियोजीत आहे ?

A. मुंबई, भारत
B. न्यूयार्क, अमेरीका
C. सेऊल, द. कोरीया
D. टोकीयो, जपान

Click for answer 
C. सेऊल, द. कोरीया

10. कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात ?

A. 1991
B. 1981
C. 1931
D. 1921

Click for answer 
D. 1921
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -214”