Thursday, January 5, 2012

प्रश्नमंजुषा -166


1. रिलायन्सचे KG-D6 नैसर्गिक वायूचे भांडार (बेसिन) कोणत्या राज्यात आहे ?

A. महाराष्ट्र
B. ओरिसा
C. आंध्रप्रदेश
D. केरळ

Click for answer 
C. आंध्रप्रदेश

KG-D6 चा अर्थ आहे : कृष्णा -गोदावरी साईट ब्लॉक -6

2. भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (Competitive Commission of India) कोणत्या वर्षी स्थापन झाला ?

A. 2001
B. 2003
C. 2005
D. 2007

Click for answer 
B. 2003

अर्थात हा आयोग व्यापारातील स्वातंत्र्य आणि ग्राहक हित हे लक्षात घेवून स्थापलेला आहे.

3. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान (National Park) कोणत्या राज्यात आहे ?

A. महाराष्ट्र
B. ओडिशा
C. गुजरात
D. उत्तराखंड

Click for answer 
B. ओडिशा


4. एव्हीयन इन्फ्लूएन्झा (avian influenza) हा आजार कोणत्या नावाने विशेष प्रसिध्द आहे ?

A. काला आजार
B. स्वाईन फ्लू
C. बर्ड फ्लू
D. मलेरिया

Click for answer 
C. बर्ड फ्लू

5. भारतात राज्यघटनेचा अंतिम संरक्षक आणि अर्थ लावणारी अंतिम संस्था कोणाला म्हणतात?

A. पंतप्रधान कार्यालय
B. राष्ट्रपती कार्यालय
C. महान्यायवादींचे कार्यालय
D. सर्वोच्च न्यायालय

Click for answer 
D. सर्वोच्च न्यायालय

6. राज्यसभेतून दर 2 वर्षांनी एकूण सदस्य संख्येच्या किती हिस्सा सदस्य निवृत्त होतात ?

A. 1/3
B. 1/4
C. 1/6
D. 1/12

Click for answer 
A. 1/3

7. अलीकडेच पंतप्रधानांनी स्वर्गीय पुरण चंद्र गुप्ता यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण केले. ते कोणत्या दैनिकाचे संस्थापक होते ?

A. अमर उजाला
B. महानगर
C. जनसत्ता
D. जागरण

Click for answer 
D. जागरण

8. डॉ.रमण सिंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?

A. उत्तराखंड
B. हिमाचल प्रदेश
C. पंजाब
D. छत्तीसगड

Click for answer 
D. छत्तीसगड

9. ओक्राम इबोबी सिंग हे सध्याचे __________ राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

A. पंजाब
B. मणिपूर
C. उत्तराखंड
D. मेघालय

Click for answer 
B. मणिपूर

10. के.शंकरनारायणन हे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यापूर्वी कोणत्या राज्यात राज्यमंत्रिमंडळात मंत्रीपदी होते ?

A. तामिळनाडू
B. कर्नाटक
C. केरळ
D. आंध्रप्रदेश

Click for answer 
C. केरळ

प्रश्नमंजुषा -165


1. भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना 1902 मध्ये कोठे सुरु झाला ?

A. कोईम्बतूर
B. कोलकाता
C. पुणे
D. मुंबई

Click for answer 
A. कोईम्बतूर

2. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

A. शरद पवार
B. यशवंतराव चव्हाण
C. वसंतराव नाईक
D. वसंतदादा पाटील

Click for answer 
B. यशवंतराव चव्हाण

3. 'मणिभवन ' हे नाव कोणत्या नावाशी निगडीत आहे ?

A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. महात्मा गांधी
C. सरदार पटेल
D. विनोबा भावे

Click for answer 
B. महात्मा गांधी


4. भारताच्या सर न्यायाधीशांची नेमणूक __________ करतात.

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. महान्यायवादी

Click for answer 
B. राष्ट्रपती

5. 'पंजाब केसरी 'असे कोणाला म्हणत ?

A. लाला लजपतराय
B. भगतसिंग
C. राजगुरू
D. गुरु गोविंदसिंग

Click for answer 
A. लाला लजपतराय


6. भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला ______________.

A. विजयालक्ष्मी पंडित
B. मिसेस ऍनी बेझंट
C. सरोजिनी नायडू
D. मॅडम कामा

Click for answer 
B. मिसेस ऍनी बेझंट

7. 'जालियनवाला बाग ' हत्याकांड _________ शहरात झाले.

A. लखनौ
B. बराकपूर
C. दिल्ली
D. अमृतसर

Click for answer 
D. अमृतसर

8. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

A. व्ही.व्ही.गिरी
B. एस.राधाकृष्णन
C. डॉ.झाकीर हुसेन
D. डॉ.राजेंद्रप्रसाद

Click for answer 
D. डॉ.राजेंद्रप्रसाद


9. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पध्दती _______ साली सुरु करण्यात आली.

A. 1947
B. 1959
C. 1960
D. 1962

Click for answer 
D. 1962

10. घटक राज्याचा घटनात्मक शासन प्रमुख ___________ हा असतो.

A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. राज्यपाल

Click for answer 
D. राज्यपाल

Tuesday, January 3, 2012

प्रश्नमंजुषा -164


पृथ्वी सूर्याला जवळ असताना उपभू स्थितीत तर दूर असताना अपभू स्थितीत असते. त्यामुळे या दोन्ही स्थितीमधील दिवसांना विशेष महत्व प्राप्त होते. ३ जानेवारी या दिवशी पृथ्वी सूर्यापासून सर्वाधिक जवळ असल्याने भ्रमणगतीत काहीसा बदल होतो.

४ जुलै पृथ्वी ही सूर्यापासून दूर असते. उपभूस्थितीचे दिवशी सूर्य-पृथ्वी अंतर केवळ १४ कोटी ७0 लाख किलोमीटर राहून हेच अंतर अपभूस्थितीला १५ कोटी २0 लाख किलोमीटर एवढे होत असते. ३ जानेवारीला पृथ्वी-सूर्य अंतर सर्वात कमी असल्याने सूर्योदय व सूर्यास्ताचे वेळी सूर्यदर्शन किंचित मोठय़ा आकाराचे घडून येते.

1. 13 मार्च 2012 ते 12 मार्च 2013 हे वर्ष महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्याचे जन्मशताब्दी वर्ष आहे?

A. यशवंतराव चव्हाण
B. वसंतदादा पाटील
C. वसंतराव नाईक
D. मारोतराव कन्नमवार

Click for answer 
A. यशवंतराव चव्हाण

2. राज्यातील राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अंतर्गत शिकणाऱ्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमात कोणत्या विषयाचा अनिवार्य विषय म्हणून समावेश झाला आहे ?
A. पर्यावरण शिक्षण
B. सामाजिक नीतिमूल्ये
C. सामान्य ज्ञान
D. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (इन्फरमेशन अँण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी)

Click for answer 
D. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (इन्फरमेशन अँण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी)

3. अलीकडेच भगवतगीतेसंबंधीचा वाद कोणत्या देशात झाला ?

A. रशिया
B. अमेरिका
C. इंग्लंड
D. सिरीया

Click for answer 
A. रशिया

4. बजाजने 3 जानेवारी 2012 रोजी बाजारात आणलेल्या लहान आणि स्वस्त कारचे नाव काय ?

A. नॅनो
B. आर ई-60
C. एमआयईव्ही
D. रेवा

Click for answer 
B. आर ई-60
याविषयी 30 डिसेंबर 2011 लाच सविस्तरपणे लिहिले होते खालील ठिकाणी:
http://gkgscurrent.blogspot.com/2011/12/india-ccaner-project-and-bajajs-re60.html


5. आजचा ( 3 जानेवारी 2012) विचार करता कोणत्या देशाचा समावेश संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीत स्थायी अथवा अस्थायी सदस्य देश म्हणून समावेश नाही ?

A. भारत
B. पाकिस्तान
C. चीन
D. बांगलादेश

Click for answer 
D. बांगलादेश

ह्या विषयी सविस्तर माहिती खालील ठिकाणी वाचा.
http://gkgscurrent.blogspot.com/2012/01/international-important-events-update.html


6. 'मी सावित्री जोतिराव' ही महा-कादंबरी कोणी लिहिली ?

A. बाबासाहेब पुरंदरे
B. कविता महाजन
C. कविता मुरूमकर
D. यापैकी नाही

Click for answer 
C. कविता मुरूमकर

7. बिल गेट्‌स आणि मेलिंडा फाऊंडेशनकडून दिला जाणारा गेट्‌स इनोव्हेशन (अभिनव: लसीकरण) पुरस्कार भारतातील कोणत्या मुख्यमंत्र्याला जाहीर झाला आहे ?

A. नितीश कुमार
B. मायावती
C. नरेंद्र मोदी
D. पृथ्वीराज चव्हाण

Click for answer 
A. नितीश कुमार

8. केसरी-मराठा संस्थेतर्फे देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कार' ह्या वर्षी कोणाला जाहीर झाला आहे ?

A. दीपक टिळक , केसरी
B. एन.राम ,द हिंदू
C. उत्तम कांबळे , दैनिक सकाळ
D. श्रवण गर्ग , दैनिक भास्कर

Click for answer 
D. श्रवण गर्ग , दैनिक भास्कर

9. 99 व्या सायन्स काँग्रेसचे आयोजन 3 जानेवारी 2012 पासून कोणत्या शहरात करण्यात आले आहे ?

A. चेन्नई
B. त्रिवेंद्रम
C. बेंगळुरू
D. भुवनेश्वर

Click for answer 
D. भुवनेश्वर


ह्या संदर्भात सविस्तर लेख आम्ही 28 डिसेंबर 2011 लाच खालील ठिकाणी लिहिला होता. http://www.gkgscurrent.blogspot.com/2011/12/indian-science-congress-99-th-session.html


10. भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी म्हणून सरकारने 'आकाश ' ह्या टॅबलेट ची निर्मिती कोणत्या कंपनीच्या सहकार्याने करण्यात आली आहे ?

A. डाटाविंड
B. इन्फोविंड
C. टेकविंड
D. अवकाश

Click for answer 
A. डाटाविंड
ह्या विषयी सविस्तरपणे आम्ही काही दिवसांपूर्वी पुढील ठिकाणी लिहिले होते.
आशा आहे आपल्यालाही ही माहिती आवडेल. आपले अभिप्राय अवश्य द्या.
http://www.gkgscurrent.blogspot.com/2011/12/aakash-tablet.html

Monday, January 2, 2012

प्रश्नमंजुषा -163


1. आंतरराष्ट्रीय स्पोर्टस प्रेस असोसिएशन (एआयपीएस)निर्दोष खेळाचा(फेअर प्ले) पुरस्कार प्राप्त करणारा महेंद्रसिंग धोनी हा जगातला _________ क्रिकेटपटू आहे.

A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. दहावा

Click for answer 
A. पहिला

2.आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानवतावादी सेवक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे ?

A. सातारा
B. सोलापूर
C. कोल्हापूर
D. पुणे

Click for answer 
B. सोलापूर


3. 'विक्रमशिला गंगेटिक डॉल्फिन सँक्ट्यूअरी'हे डॉल्फिनस् साठी असलेले भारतातले एकमेव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?

A. बिहार
B. उत्तरप्रदेश
C. उत्तराखंड
D. पश्चिम बंगाल

Click for answer 
A. बिहार

4. 'अग्नी-II प्राइम ' क्षेपणास्त्राचे अलीकडेच नामकरण _________ असे करण्यात आले.

A. अग्नी - III
B. अग्नी - IV
C. पृथ्वी प्लस
D. ब्राम्होस

Click for answer 
B. अग्नी - IV


5. भारतातील किती राज्यांची सीमा भूतान देशाबरोबर आहे ?

A. एक
B. दोन
C. तीन
D. चार

Click for answer 
D. चार

6. अंजेला मर्केल ह्यांना अलीकडेच 2009 च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्या कोणत्या देशाच्या प्रमुख आहेत ?

A. ऑस्ट्रेलिया
B. पोलंड
C. जर्मनी
D. जमैका

Click for answer 
C. जर्मनी

7. 13 ते 22 जानेवारी 2012 ह्या कालखंडात पहिले हिवाळी युवा ऑलम्पिक कोठे होणे नियोजित आहे ?

A. सिंगापूर
B. मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
C. इन्सब्रुक, ऑस्ट्रिया
D. कोलकाता, भारत

Click for answer 
C. इन्सब्रुक, ऑस्ट्रिया

8. 2012 चे नियोजित उन्हाळी ऑलम्पिक लंडन येथे कोणत्या महिन्यात होणार आहेत ?

A. फेब्रुवारी-मार्च
B. मे-जून
C. जुलै-ऑगस्ट
D. ऑक्टोबर-नोव्हेंबर

Click for answer 
C. जुलै-ऑगस्ट

9. खालीलपैकी कोणते लीपवर्ष असेल ?

A. 2012
B. 2014
C. 2018
D. 2022

Click for answer 
A. 2012

10. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 {Environment(Protection)Act 1986} नुसार कोणत्या राज्यात सर्वात जास्त पर्यावरणच्या दृष्टीने संवेदनशील विभाग केंद्र सरकारने निर्देशित केलेले आहेत ?

A. उत्तराखंड
B. महाराष्ट्र
C. केरळ
D. आसाम

Click for answer 
B. महाराष्ट्र

प्रश्नमंजुषा -162


1. ताम्हाणी घाट प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. रत्‍नागिरी
B. रायगड
C. कोल्हापूर
D. बीड

Click for answer 
B. रायगड

2. खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक प्रदेशास 'शीत वाळवंट'असे गणले जाते ?

A. सूचीपर्णी अरण्याचा प्रदेश
B. भूमध्यसागरी हवामानाचा प्रदेश
C. विषुववृत्तीय हवामान प्रदेश
D. टुंड्रा प्रदेश

Click for answer 
D. टुंड्रा प्रदेश

3. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश कृषीऔद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जातो ?

A. भीमा-निरा खोरे
B. कृष्णा-पंचगंगा खोरे
C. गोदावरी खोरे
D. वर्धा खोरे

Click for answer 
B. कृष्णा-पंचगंगा खोरे

4. खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेला सह्याद्री म्हणूनही ओळखतात?

A. सातपुडा
B. पूर्व घाट
C. पश्चिम घाट
D. विंध्य

Click for answer 
C. पश्चिम घाट

5. खालीलपैकी कोणती जोडी (शहर -जिल्हा ) योग्य आहे ?

A. चिखलदरा -अकोला
B. महाबळेश्वर - सातारा
C. माथेरान - ठाणे
D. पांचगणी - रायगड

Click for answer 
B. महाबळेश्वर - सातारा

6. ईशान्य भारतातील स्थलांतरित शेतीला कोणत्या नावाने संबोधतात ?

A. पोडू
B. स्विदेन
C. झूम
D. तराई

Click for answer 
C. झूम

7. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधीक साखर कारखाने आहेत ?

A. सांगली
B. कोल्हापूर
C. सातारा
D. अहमदनगर

Click for answer 
D. अहमदनगर

8. कर्कवृत्त भारतातील किती राज्यांमधून गेले आहे ?

A. 5
B. 6
C. 7
D. 8

Click for answer 
D. 8
1.गुजरात 2. राजस्थान 3.मध्यप्रदेश 4.छत्तीसगड 5.झारखंड 6. पश्चिम बंगाल 7. त्रिपुरा 8.मिझोराम

मानसिक क्षमता चाचणी /अंकगणित

9. धनंजयच्या आईची नणंद रामची आई आहे, तर धनंजयची आई रामची कोण ?

A. मामी
B. मावशी
C. काकू
D. आत्या

Click for answer 
A. मामी

10. एक शेतकरी एक जनावर असेल की, एका जोड खुंटीस बांधतो व जनावरे वाढली की 3 खुंट्यामध्ये 2 जनावरे बांधतो तर 4 जनावरे बांधायला त्यास किती खुंट्या लागतील ?

A. 8
B. 5
C. 4
D. 3

Click for answer 
B. 5

प्रश्नमंजुषा -161


1. वृध्द व आजारी स्त्रियांची व्यवस्था 'सायंघरकुला'मध्ये कोणी केली ?

A. पंडिता रमाबाई
B. सरस्वतीबाई जोशी
C. सावित्रीबाई फुले
D. रमाबाई रानडे

Click for answer 

A. पंडिता रमाबाई

2. 25 जुलै 1917 मध्ये प्राथमिक शाळेत फी माफीची घोषणा _________ यांनी केली होती .

A. औंधचे पंतप्रतिनिधी
B. सयाजीराव गायकवाड
C. शाहू महाराज
D. महर्षी कर्वे

Click for answer 
C. शाहू महाराज


3. 'एकत्र कुटुंबपद्धती ' ह्या निबंधासाठी डेक्कन कॉलेजचे बक्षीस इ.स.1876 मध्ये कोणत्या समाजसुधारकास मिळाले होते?

A. गोपाळ गणेश आगरकर
B. र.धों. कर्वे
C. महर्षी कर्वे
D. गो.कृ.गोखले

Click for answer 
A. गोपाळ गणेश आगरकर

4. महात्मा फुले यांचे निधन कोणत्या वर्षी झाले ?

A. 1890
B. 1891
C. 1892
D. 1893

Click for answer 
A. 1890


5. महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण ?

A. प्लेटो
B. जे.एस.मिल
C. व्हॉल्टेअर
D. थॉमस पेन

Click for answer 
D. थॉमस पेन

6. 'समता संघ' खालीलपैकी संस्था कुणी स्थापन केली ?

A. महात्मा फुले
B. महर्षी कर्वे
C. वि.रा.शिंदे
D. डॉ.आंबेडकर

Click for answer 
B. महर्षी कर्वे

7. छत्रपती शाहू महाराज ________ संस्थानाचे राजे होते.

A. सातारा
B. सोलापूर
C. कोल्हापूर
D. सांगली

Click for answer 
C. कोल्हापूर

8. खालीलपैकी कोणते खेडे समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांच्या जीवनाशी निगडीत आहे ?

A. महू
B. शेरवली
C. टेंभू
D. कोतलूक

Click for answer 
C. टेंभू

9. गोपाळ गणेश आगरकरांचे पहिले पुस्तक कोणते ?

A. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल
B. राजकारणाचे अध्यात्म
C. स्त्रीदास्य विमोचन
D. डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे 101 दिवस

Click for answer 
A. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल

10. 'केसरी' चे पहिले संपादक कोण होते ?

A. गो.ग.आगरकर
B. लोकमान्य टिळक
C. न्यायमूर्ती रानडे
D. गोपाळ कृष्ण गोखले

Click for answer 
A. गो.ग.आगरकर

Sunday, January 1, 2012

प्रश्नमंजुषा -160


1. 'संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ' ही घोषणा कोणी केली ?

A. विनोबा भावे
B. महात्मा गांधी
C. लाल बहादुर शास्त्री
D. विनायक सावरकर

Click for answer 
A. विनोबा भावे

2. इ.स.1854 मध्ये ________ यांनी मुंबई येथे कापडाची गिरणी सुरु केली.

A. कावसजी दावर
B. सर मंगलदास नथुभाऊ
C. मोरारजी गोकुळदास
D. दिनशा पेटीट

Click for answer 
A. कावसजी दावर

3. मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्त्व कोणी केले ?

A. शंकरराव मोरे
B. केशवराव जेधे
C. सेनापती बापट
D. नारायण मेघाजी लोखंडे

Click for answer 
C. सेनापती बापट

4. 'वेदांकडे वळा' असे कोणी म्हटले होते ?

A. रामकृष्ण परमहंस
B. राजा राम मोहन रॉय
C. स्वामी दयानंद सरस्वती
D. स्वामी विवेकानंद

Click for answer 
C. स्वामी दयानंद सरस्वती

5. 25 डिसेंबर 1927 रोजी __________ यांनी मनुस्मृतीचे दहन केले.

A. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
B. गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे
C. एस.एम.जोशी
D. बी.के.गायकवाड

Click for answer 
A. डॉ.बाबासाहेब आंबेडकर

6. सन 1940 मध्ये _____________ यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली.

A. श्री.एस.एम.जोशी
B. श्री.रामराव देशमुख
C. श्री.ज.स.करंदीकर
D. श्री.गं.त्र्य.माडखोलकर

Click for answer 
B. श्री.रामराव देशमुख

7. कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरु झाली ?

A. 1892
B. 1909
C. 1919
D. 1935

Click for answer 
C. 1919


8. परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना , परदेशी कापडाने भरलेल्या मोटारीपुढे तिरंग्यासह _______ यांनी बलिदान दिले.

A. श्रीकृष्ण सारडा
B. जगन्नाथ शिंदे
C. कुर्बान हुसेन
D. बाबू गेनू

Click for answer 
D. बाबू गेनू

9. भारत-चीन युध्दानंतर कोणत्या पंतप्रधानांनी प्रथम चीनला भेट दिली ?

A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. इंदिरा गांधी
C. राजीव गांधी
D. पी.व्ही.नरसिंहराव

Click for answer 
C. राजीव गांधी

10. ____________ ह्या चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली.

A. दामोदर आणि गोपाळ
B. बाळकृष्ण आणि वासुदेव
C. बाळकृष्ण आणि गोपाळ
D. दामोदर आणि बाळकृष्ण

Click for answer 
D. दामोदर आणि बाळकृष्ण

नूतन वर्षाभिनंदन !!!

2011  च्या अंतिम काही क्षणांकडे आपण वाटचाल करत आहोत. 2012  चा सूर्य आपल्यासोबत नवी  आशा, नवी स्वप्ने आणेल. ह्या वर्षी आपणा सर्वांना यश लाभो अशी मनोकामना. तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी पोहोचवताना आम्हालाही खारीचा वाटा उचलायला नक्कीच आवडेल. आपण गेल्या वर्षी ह्या ब्लॉगला भरभरून प्रेम दिले. एक क्षण असा होता कि पुरेश्या प्रतिसादा अभावी सर्व काही बंद करण्याच्या निर्णया पर्यंत आम्ही आलो होतो. आता परिस्थिती  180  अंशात बदलली आहे. इतका उदंड प्रतिसाद एखाद्या मराठी ब्लॉगला मिळेल ह्याची कल्पनाही करवणार नाही इतक्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कान्याकोपर्‍यापर्यंत तुम्ही ,होय तुम्हीच ह्या ब्लॉगला पोहचवले आहे. आम्ही आपल्या  प्रेमासाठी सदैव ॠणी राहू. नागपूर ते नंदुरबार, कोल्हापूर ते नांदेड , यवतमाळ ते रत्‍नागिरी  , हिंगोली, परभणी ,धुळे , जळगाव , पुणे,मुंबई असा एकही जिल्हा नाही तेथून वाचक आमच्या ह्या ब्लॉगवर पोहचत नाहीत. आपण भरभरून दिलेल्या प्रतिक्रिया आपल्या स्नेहाच्याच प्रतिक आहेत.

वेळोवेळी वाचक काही शंका , सूचना पाठवतात. त्यातील शक्य आणि रास्त असलेल्या सूचनांना आम्ही  प्रसिद्धीही दिली. अगदी क़्वचितच आमच्याकडून झालेल्या पण तुम्ही नजरेत आणून दिलेल्या चुका  आम्ही आपले आभार मानून दुरुस्तही केल्या.


 अर्थात आम्ही सर्वच सूचना वाचतो, पण जर चूक नसेल तर अश्या सूचना बाजूला करतो, अर्थात त्यासाठीही आम्ही आपले ॠणी आहोत. पण वेळेअभावी अशा बाबीच्या बाबत आम्ही सविस्तरपणे लिहू शकत नाहीत त्यासाठी आपण आम्हाला  माफ कराल अशी आशा.

नवीन वर्षाचा संकल्प म्हणून आम्ही काही वाढीव बाबी नियोजित आहोत.
--------------------------------------------------------------------------------------

१.  पूर्वीप्रमाणेच आता आपण वाचत आहात हा ब्लॉग नियमितपणे अपडेट होत राहील. वेळोवेळी दिवसाकाठी जास्तीतजास्त  माहिती आपणा पर्यन्त पोहचवण्याचा आम्ही प्रयत्‍न करू. महाराष्ट्र पातळीवरील सर्व प्रकारच्या परीक्षा मग त्या निवड मंडळाच्या असोत , डी.एड .सीईटी असो कि पोलीस भरती असो.सर्व मित्रांना विशेषतः ग्रामीण भागातील मित्रांना ह्याची मदत होईल अश्या प्रकारे हा ब्लॉग अपडेट केला जाईल. अर्थात हे सर्व करत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत होणार्‍या परीक्षांना अग्रक्रम दिला जाईल.
-------------------------------------------------------------------------------------------------------

२.  http://mpscexamination.blogspot.com/  हा ब्लॉग पूर्वीप्रमाणेच महाराष्ट्र पातळीवरील परीक्षांच्या तयारीसाठी इंग्रजी माध्यमातील मित्रांना मदत करण्यासाठी अपडेट केला जाईल. फक्त ह्या ब्लॉगवरील मर्यादित प्रतिसाद पाहता सध्या तरी असे अपडेट्स अनियमित पाने होतील. होतील मात्र हे नक्की.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
३. गेल्या काही दिवसांपूर्वीच आम्ही सुरु केलेला आणि अल्पावधीतच संपूर्ण भारताच्या पसंतीस येत  असलेल्या  http://gkgscurrent.blogspot.com/ ह्या ब्लॉग विषयी आम्ही ह्या वर्षी जास्त सजग राहू. अतिशय सुंदर मांडणी आणि बँकिंगच्या परीक्षा , शाळा महाविद्यालयात होणार्‍या 'Quiz'  ते UPSC  पूर्व परीक्षा अश्या सर्व पातळ्यांवर आपणा सर्वांना लाभदायक ठरेल असा एक 'ऑनलाईन मित्र ' च आम्ही तयार करीत आहोत. सुरुवातीच्या मोजक्याच दिवसात मिळालेल्या भन्नाट प्रतिसादानंतर आता काय काय अपडेट करायचे याची भली थोरली यादीच आता माझ्या टेबलावर आहे. फक्त एकच सांगेन. धन्यवाद आणि तुमच्या नियमित भेटी आम्हाला प्रेरणा देतात तेव्हा नियमित भेट देत राहा.

पुन्हा एकदा मन:पूर्वक आभार. आणि नम्र पणे आम्ही सांगू इच्छितो की हे सर्व ब्लॉग्स तुमचेच आहेत तेव्हा अधिकाधिक  मित्र मैत्रिणींना ह्या विषयी सांगा, ईमेल द्वारे कळवा , किंवा कोठेही अगदी फेसबुक ते इतर फोरम ह्या तुमच्या ब्लॉग्जविषयी तुम्ही तुमची मते मांडत राहा.

 नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!!!Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत