Wednesday, December 12, 2012

Motivational Story of Susan Boyle


आज प्रकाशित केलेली प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा किंवा डाव्या बाजूच्या लिस्ट चा आधार घ्या.
प्रश्नमंजुषा - 12 डिसेंबर 2012

प्रेरणादायी कथा - सुझान बोयल


'प्रेरणादायी' - हा विभाग आम्ही का सुरु करत आहोत ?

स्पर्धा परीक्षांच्या ह्या थकवून टाकण्यार्‍या स्पर्धेत उतरणारा प्रत्येक परीक्षार्थी आम्हाला नेहमीच योद्ध्यासमान भासतो. लाखो उमेदवारांच्या अतिशय निकराच्या चढाईत हा गड जिंकण्यासाठी यातील प्रत्येक स्पर्धक लढत राहतो. अशा वीरांच्या कथा काढल्या तर पाने भरतील, त्यातही हि लढाई विषम. त्याला लढावे लागते ते स्वत:च्या स्वप्नांसाठी. तसा यातील प्रत्येक स्पर्धक एक खंबीर नेता आहे. त्याला ठावूक आहे, उद्याचा भारत त्याच्याच/तिच्याच मनगटातील ताकदीवर चालणार आहे. पण तरीही, ह्या ताणतणावाच्या कालचक्रात तिला/त्याला उभारी देईल, पुन्हा लढण्याची जिद्द देईल , नवीन काही बाबी आपल्यापर्यंत पोहचवणे असा काहीसा या मागचा हेतू आहे.

जर ह्या उपक्रमाला प्रतिसाद नाही मिळाला, तर लगेच हे सर्व थांबवू . आम्ही नेहमीच प्रत्येक पोस्ट च्या पेजलोड वर नजर ठेवून असतो. तुम्ही कोणत्या पेजवर किती वेळा भेट देता, यावर काय चालू ठेवायचे आणि काय त्यागून द्यायचे याचा निर्णय होतो. कारण हा तुमचा ब्लॉग आहे, आम्ही निमित्तमात्र आहोत.सुझान बोयल कि सुझान बॉयल - काहीही असो. पण आता त्या जिवंत दंत कथा आहेत हे नक्की. 2009 च्या 'ब्रिटनस् गॉट टॅलेंट ', ह्या कार्यक्रमात त्या अवतरल्या. आपल्याकडच्या 'इंडियाज गॉट टॅलेंट' सारखा हा 'रियालिटी शो '. तेव्हा त्यांचे वय होते अवघे 47 वर्षे आणि त्या आल्या होत्या एका लहानशा खेडेगावातून , अगदी आपल्याकडच्या ग्रुप ग्रामपंचायती तील एक गाव असाव्या अश्या गावातून. अतिशय गावंढळ म्हणता येईल असे राहणीमान आणि एकंदरच अवतार. पण 'Never judge a book by cover' असे म्हणण्याजोगे सर्व वर्तन. त्या नंतर त्या गायल्या. खालील व्हिडिओ त्या कार्यक्रमाचाच आहे, जर पूर्वी पाहिला नसेल, तर अगदी काळजीपूर्वक एकेक फ्रेम पहा. त्या स्टेजवर आल्या तेव्हा परीक्षकांसह बराचसा श्रोता वर्ग "कसलं ध्यान आलं?" ह्या 'लुक ' ने त्यांच्याकडे पाहते ,अक्षरश: खिल्ली उडवतात आणि त्या नंतर पॉप संगीतातील त्यांचे ते गाणे, स्टेज ला आग लावणे म्हणतात ते हेच का? शेवटी , परीक्षकही मान्य करतात कि त्यांचे सुरुवातीचे मत प्रतिकूल होते. पण कॉमेंट्स देताना एक परीक्षक म्हणतेही " हा परफॉर्मन्स पाहणे हा त्यांच्यासाठी बहुमान होता." आज सुझान एक यशस्वी व्यावसायिक पॉप गायिका आहेत. बुध्दीमत्ता प्रत्येक वेळेला लगेचच नजरेत भरते असे नाही . सुझान ना त्या साठी वयाची 47 वर्षे पर्यंत वाट पहावी लागली. पण त्या आज "The Susan Boyle" आहेत. आशा आहे आपल्यालाही त्या प्रेरणा देतील.


सुझान यांनी स्टेजवर सादर केलेल्या गाण्याचे शब्द खाली देत आहोत.
या पूर्ण गीतापैकी बोल्ड केलेला हिस्सा त्यांनी ह्या परफॉर्मन्स दरमान्य सादर केला.
खालील व्हिडिओ येथे जर चालला नाही तर त्यात येणार्‍या "Watch on Youtube" ह्या लिंक वर क्लिक करा.

There was a time when men were kind
When their voices were soft
And their words inviting
There was a time when love was blind
And the world was a song
And the song was exciting
There was a time
Then it all went wrong

I dreamed a dream in time gone by
When hope was high
And life worth living
I dreamed that love would never die
I dreamed that God would be forgiving
Then I was young and unafraid
And dreams were made and used and wasted
There was no ransom to be paid
No song unsung, no wine untasted

But the tigers come at night
With their voices soft as thunder
As they tear your hope apart
As they turn your dream to shame


He slept a summer by my side
He filled my days with endless wonder
He took my childhood in his stride
But he was gone when autumn came

And still I dream he'll come to me
That we will live the years together
But there are dreams that cannot be
And there are storms we cannot weather

I had a dream my life would be
So different from this hell I'm living
So different now from what it seemed
Now life has killed the dream I dreamed.


सुझान यांच्यावरील विकिपीडियाचे हे पेज पहा.

http://en.wikipedia.org/wiki/Susan_Boyle