Saturday, February 4, 2012

प्रश्नमंजुषा -201


धन्यवाद !
आधीच्या पोस्टमध्ये आम्ही आवाहन केल्याप्रमाणे आमच्या 300 हून अधिक मित्र-मैत्रिणींनी ई-मेल द्वारे आमच्याविषयी लिहिले. आम्ही आपले त्यासाठी आभारी आहोत. सोमवारी रात्रीपर्यंत आम्ही अश्या इमेलची दखल घेऊ. मंगळवार सकाळपासून आपणाला अपडेट्स येणे सुरु होईल. धन्यवाद !!

1. मानव अधिकारांचे संरक्षण अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी भारतीय संसदेने मानव अधिकार संरक्षण कायदा , 1993 च्या अंतर्गत _____________ ची स्थापना केली आहे .

A. राष्ट्रीय मानव अधिकार आयोग
B. राज्य मानव अधिकार आयोग
C. मानव अधिकार न्यायालय
D. वरील सर्व

Click for answer 
D. वरील सर्व

2.राज्य मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्ष पदी अशी व्यक्ती आरूढ होऊ शकते जी ने __________________ पदी काम केलेले आहे .

A. उच्च न्यायालयातील न्यायाधीश
B. त्या संबंधित राज्यातील जिल्हा न्यायाधीश
C. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश
D. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश

Click for answer 
C. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश

3. मानव अधिकारांच्या हननामुळे निर्माण झालेल्या गुन्ह्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यातील ____________ ला त्या गुन्ह्यांचा निवडा करण्यासाठी मानव अधिकार न्यायालय म्हणून नामनिर्देश करू शकते .

A. न्याय चौकशी न्यायालय
B. सत्र न्यायालय
C. विशेष न्यायालय
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer 
B. सत्र न्यायालय

4. देऊन टाकता न येणार्‍या अधिकारांची संकल्पना ________________ यांनी केली .

A. थॉमस होबेज
B. रॉस्यो
C. जॉन लॉके
D. वरील कोणीही नाही

Click for answer 
C. जॉन लॉके

5. भारताने नागरी व राजकीय हक्कांनवरील आंतरराष्ट्रीय प्रसंविदा , 1966 ला , केव्हा मंजुरी दिली ?

A. 27 मार्च 1979
B. 27 एप्रिल 1978
C. 27 एप्रिल 1980
D. 27 मार्च 1978

Click for answer 
A. 27 मार्च 1979

6. भारतीय संविधानाच्या कोणत्या विभागात आर्थिक ,सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कावरील आंतरराष्ट्रीय प्रसंविदा, 1966 मधील हक्क नमूद केलेली आहे ?

A. विभाग 4-A
B. विभाग 2
C. विभाग 3
D. विभाग 4

Click for answer 
D. विभाग 4

7. नागरी व राजकीय हक्कांनवरील आंतरराष्ट्रीय प्रसंविदा , 1966 भारतातील खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे ?

A. वैधानिक हक्क
B. मुलभूत अधिकार
C. पारंपारिक अधिकार
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer 
B. मुलभूत अधिकार

8. खालील नमूद अधिकारांपैकी कोणत्या अधिकाराची भारतीय संविधानात स्पष्टपणे मुलभूत अधिकार म्हणून गणना केली आहे ?

A. गुप्ततेचा अधिकार
B. जलद न्यायदानाचा अधिकार
C. कायदेविषयक सहाय्य देण्याचा अधिकार
D. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार

Click for answer 
D. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार

9. हुंडा घेण्यासाठी अथवा देण्यासाठी केलेला करार _________ ठरतो .

A. वैध
B. अवैधक्षम
C. शून्य (अंमलात येऊ न शकणारा )
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer 
C. शून्य (अंमलात येऊ न शकणारा )

10. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनिय , 2005 मध्य खालीलपैकी कोणता आदेश नमूद केलेला नाही ?

A. ताबा देण्यासंबंधीचा आदेश
B. भरपाई देण्याचा आदेश
C. निवासी आदेश
D. मनाई आदेश

Click for answer 
D. मनाई आदेश