Dedicated Blog

Dedicated Blog

Wednesday, December 7, 2011

एम पी एस सी च्या विविध परीक्षांचे वेळापत्रक

आयोगाने स्वत: च्या अधिकृत वेबसाईट वर दिलेले आगामी परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक खालीलप्रमाणे :


आतापर्यंत आयोगाने हे वेळापत्रक पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, अर्थात राज्यसेवा मुख्य परीक्षेत होणारे बदल लक्षात घेता काही प्रमाणात त्यात बदलही अपेक्षित आहेत.

प्रश्नमंजुषा -133
http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.


1. कोणत्या कार तयार करणाऱ्या कंपनीचे नाव हे लोहार (blacksmith) ह्या शब्दाच्या इटालियन भाषेतील प्रतिशब्दावर आधारित आहे ?

A. फरारी
B. व्होक्सवॅगन
C. फोर्ड
D. हुंडाई

Click for answer 
A. फरारी

2. व्हिडीओकॉन डी-टू-एच साठी कोणता अभिनेता ब्रँड अम्बेसिडर आहे ?
A. अमिताभ बच्चन
B. अभिषेक बच्चन
C. अक्षयकुमार
D. आमीर खान

Click for answer 
B. अभिषेक बच्चन


3. भंवरीदेवी प्रकरण कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

A. हरियाणा
B. गुजरात
C. राजस्थान
D. बिहार

Click for answer 
C. राजस्थान

4. 2010 पासून कोणता क्रिकेटपटू 'तोशिबा ' कंपनीचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून कार्य करीत आहे ?

A. सचिन तेंडूलकर
B. गौतम गंभीर
C. युसुफ पठाण
D. महेंद्रसिंग धोणी

Click for answer 
A. सचिन तेंडूलकर


5. 2011 मध्ये झालेल्या आय.सी.सी. विश्वचषक स्पर्धेच्या उद्‌घाटनाचा समारंभ कोठे पार पडला ?

A. मुंबई , भारत
B. लाहोर , पाकिस्तान
C. कोलंबो .श्रीलंका
D. ढाका , बांगलादेश

Click for answer 
D. ढाका , बांगलादेश

6. आय.टी.क्षेत्रातील कोणती व्यक्ती आय.सी.आय.सी.आय.बँकेची नॉन-एक्झीक्युटीव्ह चेअरमन म्हणूनही कार्यरत आहे ?

A. नारायण मूर्ती
B. अझीम प्रेमजी
C. रतन टाटा
D. के.व्ही.कामत

Click for answer 
D. के.व्ही.कामत


7. युसुफ आणि इरफान पठाण हे पठाण बंधू कोणत्या संघाकडून रणजी स्पर्धा खेळतात ?

A. मुंबई
B. महाराष्ट्र
C. भारतीय रेल्वे
D. बडोदा

Click for answer 
D. बडोदा

8. बायोकॉन (Biocon) ह्या कंपनीशी निगडीत यशस्वी महिला उद्योजक कोण आहेत ?

A. चंदा कोचर
B. किरण मुझुमदार शॉ
C. मेघा मित्तल
D. इंद्रा नूयी

Click for answer 
B. किरण मुझुमदार शॉ

9. भारताने क्रिकेट विश्वचषक सामन्यात सर्वाधिक 413 धावा कोणत्या संघाविरुध्द खेळताना नोंदवल्या आहेत ?

A. बर्मुडा
B. स्कॉटलंड
C. झिम्बाब्वे
D. केनिया

Click for answer 
A. बर्मुडा

10. 'जावा' ही प्रोग्रामिंग ची भाषा (language) विकसित करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते ?

A. जेम्स गोसलिंग
B. विनोद खोसला
C. बिली जॉय
D. मार्क झुकरबर्ग

Click for answer 
A. जेम्स गोसलिंग

Tuesday, December 6, 2011

प्रश्नमंजुषा -132http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.


1. रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय कोण होते ?

A. किरण बेदी
B. सी.डी.देशमुख
C. दीप जोशी
D. विनोबा भावे

Click for answer 
D. विनोबा भावे

2. सन 1844 मध्ये 'गडकर्‍यां‌‍चा उठाव ' खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता ?
A. नागपूर
B. रायगड
C. औरंगाबाद
D. कोल्हापूर

Click for answer 
D. कोल्हापूर

3. ' फॅदम ' हे परिमाण (UNIT) कशासाठी वापरले जाते ?

A. तार्‍यां‍‌मधील अंतर मोजण्यासाठी
B. समुद्राची खोली मोजण्यासाठी
C. सागरी जलाची क्षारता मोजण्यासाठी
D. वायुदाब मोजण्यासाठी

Click for answer 
B. समुद्राची खोली मोजण्यासाठी

4. 'नॅको ' कशाशी संबंधित आहे ?

A. हवाई वाहतूक
B. शालेय शिक्षण
C. महिला विकास
D. एड्स

Click for answer 
D. एड्स

5. 'भटनागर पुरस्कार' कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिले जातात ?

A. शास्त्र
B. साहित्य
C. शांतता
D. चित्रपट

Click for answer 
A. शास्त्र

6. खालीलपैकी कोणती भाषा ही संयुक्त राष्ट्र संघटना (UNO) ची शासकीय भाषा नाही ?

A. हिंदी
B. स्पॅनिश
C. रशियन
D. फ्रेंच

Click for answer 
A. हिंदी

7. हिरव्या वनस्पतींना ____________ म्हणतात.

A. उत्पादक
B. प्राथमिक भक्षक
C. द्वितीय भक्षक
D. सह्जीवी

Click for answer 
A. उत्पादक

8. ______________ हा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा आहे.

A. नंदूरबार
B. गडचिरोली
C. कोल्हापूर
D. गोंदिया

Click for answer 
B. गडचिरोली

9. पंडित रविशंकर हे नाव कोणत्या वाद्याशी निगडित आहे ?

A. सतार
B. सारंगी
C. तबला
D. बासरी

Click for answer 
A. सतार

10. ________ या देशाला 'पांढऱ्या हत्तींचा देश ' म्हणून ओळखतात.

A. भारत
B. केनिया
C. थायलंड
D. कंबोडिया

Click for answer 
C. थायलंड

nivedan


एक निवेदन:
आमचा कोणत्याही शहरातील कोणत्याही  स्पर्धा परीक्षा केंद्रांशी कसलाही संबंध नाही .  कृपया याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती.

Monday, December 5, 2011

प्रश्नमंजुषा -131http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.


1. संसदीय समित्यांचे पदाधिकारी नेमण्याचा अधिकार कोणाला आहे ?

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. उपराष्ट्रपती
D. लोकसभेचे सभापती

Click for answer 
D. लोकसभेचे सभापती

2. कोणत्या कलमान्वये राज्य व समवर्ती सूची वगळता इतर विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केंद्राला असतो ?
A. कलम 368
B. कलम 144
C. कलम 248
D. कलम 124

Click for answer 
C. कलम 248

3. घटनात्मक बाब तपासण्यासाठी किमान किती न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन करण्याची तरतूद आहे ?

A. एक
B. तीन
C. पाच
D. सात

Click for answer 
C. पाच

4. पंतप्रधान हे ____________ चे पदसिध्द अध्यक्ष असतात.

A. योजना आयोग
B. निवडणूक आयोग
C. भारतीय लोकसेवा आयोग
D. वित्त आयोग

Click for answer 
A. योजना आयोग

5. गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते ?

A. गावातून गोळा होणारा महसूल
B. लोकसंख्या
C. गावाचे क्षेत्रफळ
D. वरील तीनही घटकांवरून

Click for answer 
B. लोकसंख्या

6. पोलीस पाटलाला शिक्षा करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

A. सरपंच
B. ग्रामसेवक
C. पोलीस निरीक्षक
D. तहसीलदार

Click for answer 
D. तहसीलदार

7. राष्ट्राचा वास्तविक शासक ( Real head) कोण असतो ?

A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. केंद्रीय गृहमंत्री

Click for answer 
C. पंतप्रधान

8. अमेरिकेत दर _______ वर्षांनी अध्यक्ष पदासाठी निवडणुक होते .

A. तीन
B. चार
C. पाच
D. सहा

Click for answer 
B. चार

9. लोकायुक्ताची निवड _________ करतो.

A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. राज्यपाल
D. मुख्यमंत्री

Click for answer 
C. राज्यपाल

10. भारतीय निवडणूक आयोगाचा दर्जा कोणत्या स्वरूपाचा आहे ?

A. सल्लागार
B. कायदेशीर
C. संविधानात्मक
D. प्राधिकरण

Click for answer 
C. संविधानात्मक

Sunday, December 4, 2011

प्रश्नमंजुषा -130


1. आयुत्थाया हे नाव 'अयोध्या ' ह्या नावांचा एका भाषेतील अपभ्रंश आहे. आयुत्थाया हे कोणत्या देशातील एका प्रांताच्या राजधानीचे शहर आहे ?

A. मलेशिया
B. इंडोनेशिया
C. थायलंड
D. म्यानमार

Click for answer 
C. थायलंड

2. सह्याद्री पर्वतातील महाराष्ट्रात असलेले सर्वात उंच शिखर कोणते ?
A. बैरागगड
B. गुरुशिखर
C. माथेरान
D. कळसूबाई

Click for answer 
D. कळसूबाई

3. महाराष्ट्रात 100% साक्षर झालेला पहिला जिल्हा म्हणजे __________.

A. पुणे
B. ठाणे
C. सिंधुदुर्ग
D. रत्नागिरी

Click for answer 
C. सिंधुदुर्ग

4. ' अजिंक्यतारा ' हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. सोलापूर
B. सातारा
C. सांगली
D. कोल्हापूर

Click for answer 
B. सातारा

5. ___________ या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात ?

A. नागपूर
B. सोलापूर
C. पुणे
D.सिंधुदुर्ग

Click for answer 
C. पुणे

6. भारतीय संविधानात पहिली घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली ?

A. 1949
B. 1950
C. 1970
D. 1966

Click for answer 
B. 1950

7. गांधी विरुध्द गांधी या नाटकाचे लेखन कोणी केले आहे ?

A. अजित दळवी
B. तुषार गांधी
C. विजय तेंडूलकर
D. संतोष पवार

Click for answer 
A. अजित दळवी

8. 1942 च्या चलेजाव चळवळीच्या कालखंडात खालील पैकी कोणी 'वानर सेना ' स्थापन केली होती ?

A. अच्युतराव पटवर्धन
B. सरदार पटेल
C. पंडित जवाहरलाल नेहरू
D. इंदिरा गांधी

Click for answer 
D. इंदिरा गांधी

9. राष्ट्रीय उत्पन्न कोणाकडून जाहीर केले जाते ?

A. नियोजन मंडळ
B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया
C. अर्थमंत्रालय
D. सेंट्रल स्टॅटिस्टीकल इन्स्टिट्यूट

Click for answer 
D. सेंट्रल स्टॅटिस्टीकल इन्स्टिट्यूट

10. नाबार्ड स्थापनेचे मूळ उद्दिष्ट काय आहे?

A. कृषीक्षेत्रास कर्ज पुरवठा
B. लघुउद्योगांना अर्थसहाय्य
C. मोठ्या उद्योगांना अर्थसहाय्य
D. अनिवासी भारतीयांना अर्थसहाय्य

Click for answer 
A. कृषीक्षेत्रास कर्ज पुरवठा

Thursday, December 1, 2011

प्रश्नमंजुषा -129http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.


1. तापी नदी कोणत्या पर्वतात उगम पावते ?

A. सातपुडा
B. सह्याद्री
C. विंध्य
D. अरावली

Click for answer 
A. सातपुडा

2. उजनी धरण कोणत्या जिल्ह्याच्या क्षेत्रात बांधले आहे ?
A. कोल्हापूर
B. सांगली
C. सोलापूर
D. सातारा

Click for answer 
C. सोलापूर

3. महाराष्ट्राची नाट्यपंढरी म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे ?

A. सोलापूर
B. जळगाव
C. नागपूर
D. सांगली

Click for answer 
D. सांगली


4. ' देहू ' हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे ?

A. मुळा
B. इंद्रायणी
C. भीमा
D. गोदावरी

Click for answer 
B. इंद्रायणी

5. 'आयफेल टॉवर' कोणत्या शहरात आहे ?

A. न्यूयॉर्क
B. लंडन
C. पॅरीस
D. नवी दिल्ली

Click for answer 
C. पॅरीस

6. 'ऐझवाल' हि कोणत्या राज्याची राजधानी आहे ?

A. आसाम
B. मणिपूर
C. मिझोराम
D. नागालँड

Click for answer 
C. मिझोराम

7. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता महासागर / समुद्र आहे ?

A. अरबी समुद्र
B. हिंदी महासागर
C. पाल्कची सामुद्रधुनी
D. लक्षद्विप सागर

Click for answer 
A. अरबी समुद्र


8. लवासा प्रकल्प पुणे जिल्ह्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात उभारण्यात येत आहे ?

A. चंद्रभागा
B. मोसे
C. मुळा - मुठा
D. कृष्णा

Click for answer 
B. मोसे

9. भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत ?

A. गडचिरोली
B. चंद्रपूर
C. नंदुरबार
D. औरंगाबाद

Click for answer 
A. गडचिरोली

10. खालीलपैकी कोठल्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी (मार्च ते मे ) पर्जन्याची सर्वाधिक नोंद होते ?

A. कोल्हापूर
B. सातारा
C. पुणे
D. ठाणे

Click for answer 
A. कोल्हापूर

प्रश्नमंजुषा -128http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.


1. "संपूर्ण क्रांतीचे जनक " ह्या उपाधीने खालीलपैकी कोणाला गौरविले जाते ?

A. आचार्य विनोबा भावे
B. पंडित जवाहरलाल नेहरू
C. नॉर्मन बोरलॉग
D. जयप्रकाश नारायण

Click for answer 
D. जयप्रकाश नारायण

2. 'भारत जोडो ' हे अभियान कोणी आयोजित केले होते ?
A. डॉ. अभय बंग
B. डॉ. प्रकाश आमटे
C. डॉ. बाबा आमटे
D. लालकृष्ण अडवाणी

Click for answer 
C. डॉ. बाबा आमटे

3. मराठी भाषेतील पहिले गद्यचरित्र 'सॉक्रेटीस ' हे कोणी लिहिले ?

A. कृष्णशास्त्री चिपळूणकर
B. विष्णुशास्त्री चिपळूणकर
C. बाबा पदमनजी
D. राम गणेश गडकरी

Click for answer 
A. कृष्णशास्त्री चिपळूणकर

4. 'भारत सेवक समाजा' ची स्थापना कोणी केली ?

A. महात्मा गांधी
B. नामदार गोखले
C. न्यायमूर्ती रानडे
D. लोकमान्य टिळक

Click for answer 
B. नामदार गोखले

5. स्वतंत्र पाकिस्तानाचे पहिले पंतप्रधान कोण होते ?

A. आगाखान
B. बॅ.जीना
C. खान अब्दुल गफार खान
D. लियाकत अली

Click for answer 
D. लियाकत अली


6. 'महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ ' ची स्थापना कोणी केली ?

A. महर्षी कर्वे
B. महात्मा फुले
C. पंजाबराव देशमुख
D. कर्मवीर भाऊराव पाटील

Click for answer 
D. कर्मवीर भाऊराव पाटील

7. विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे ?

A. अहमदाबाद
B. त्रिवेंद्रम
C. बेंगळुरू
D. महेंद्रगिरी

Click for answer 
B. त्रिवेंद्रम

8. भारताने आपला पहिला उपग्रह 'आर्यभट्ट' कोणत्या वर्षी अवकाशात प्रक्षेपित केला ?

A. 1969
B. 1975
C. 1990
D. 2001

Click for answer 
B. 1975


9. कोणाचा जन्मदिन हा 'स्त्री मुक्ती दिन ' म्हणून साजरा केला जातो ?

A. रमाबाई रानडे
B. सावित्रीबाई फुले
C. आनंदीबाई जोशी
D. इंदिरा गांधी

Click for answer 
B. सावित्रीबाई फुले

10. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता ?

A. महाराष्ट्र श्री
B. भारतरत्‍न
C. महाराष्ट्र भूषण
D. द्रोणाचार्य पुरस्कार

Click for answer 
C. महाराष्ट्र भूषण

प्रश्नमंजुषा -127http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.


1. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

A. कुमार गंधर्व - शिवपुत्र सिध्दारामय्या कोमकल्ली
B. सवाई गंधर्व - पंडित रामभाऊ कुंदगोळकर
C. बाल गंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस
D. गीत रामायणकार - व्यंकटेश माडगुळकर

Click for answer 
D. गीत रामायणकार - व्यंकटेश माडगुळकर
गीत रामायण हि प्रासादिक रचना ग.दि.माडगुळकर यांची.
व्यंकटेश माडगुळकर हे नामांकित लेखक त्यांचेच लहान बंधू.

2. 'ट्रेन टू पाकिस्तान ' हे नावाजलेले पुस्तक कोणी लिहिले ?
A. खुशवंत सिंग
B. लियाकत अली
C. नवाज शरीफ
D. विक्रम सेठ

Click for answer 
A. खुशवंत सिंग

3. जागतिक ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

A. 15 मार्च
B. 15 जानेवारी
C. 15 डिसेंबर
D. 15 एप्रिल

Click for answer 
A. 15 मार्च

4. 'वनराई' हि चळवळ कोणी उभी केली ?

A. अण्णा हजारे
B. पोपटराव पवार
C. मोहन धारिया
D. मेधा पाटकर

Click for answer 
C. मोहन धारिया

5. 'पुष्कर तलाव ' भारतातील कोणत्या शहरात आहे ?

A. हैद्राबाद
B. अजमेर
C. गांधीनगर
D. श्रीनगर

Click for answer 
B. अजमेर

6. 'चढाई ' हि संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

A. क्रिकेट
B. कबड्डी
C. बुद्धिबळ
D. हॉकी

Click for answer 
B. कबड्डी

7. एच 5 एन 1 (H5N1) हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे ?

A. सार्स
B. स्वाईन फ्लू
C. बर्ड फ्लू
D. एड्स

Click for answer 
C. बर्ड फ्लू

8. 'इराणी करंडक ' हा कोणत्या खेळाशी संबधित आहे ?

A. कबड्डी
B. क्रिकेट
C. गोल्फ
D. लोंन टेनिस

Click for answer 
B. क्रिकेट

9. खार जमीन संशोधन केंद्र कोठे आहे ?

A. रत्नागिरी
B. सिंधुदुर्ग
C. पनवेल
D. गणपतीपुळे

Click for answer 
C. पनवेल

10. औरंगजेबाची कबर कोणत्या शहरात आहे ?

A. खुल्ताबाद
B. लाहोर
C. नवी दिल्ली
D. आग्रा

Click for answer 
A. खुल्ताबाद

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत